ठाण्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण, पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे महापालिकेच्या वतीने ऑनलाईन नोंदणीकृत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण मोहीम राबवली जात आहे

ठाण्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण, पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
Thane Drive in vaccination Inauguration by Eknath Shinde
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 5:56 PM

ठाणे : ठाणे शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेची (Vaccination Drive) व्यापकता वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने आणि रेमंड कंपनी यांच्या सहकार्याने ऑनलाईन नोंदणीकृत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरणाचा शुभारंभ आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. (Drive in vaccination for 18 to 44 year olds in Thane, Inauguration by Eknath Shinde)

ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहरातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाच्या व्यापकता वाढावी यासाठी रेमंड कंपनी येथे आजपासून ‘ड्राईव्ह ईन’ लसीकरण सुरु करण्यात आले असून आज पहिल्याच दिवशी 300 कोव्हीशील्डचे डोस देण्यात आले.

‘ड्राईव्ह ईन’ लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरीकांनाच लस देण्यात येत आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. या केंद्रावर सकाळी 11 ते 4 या वेळेत लसीकरण सुरु राहणार असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय साहाय्य समिती अध्यक्षा निशा पाटील, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, राष्ट्रवादी गटनेते नजीब मुल्ला, नगरसेविका कल्पना पाटील, रेमंड ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, उप आयुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) पुन्हा एकदा घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 51 हजार 667 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 329 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा घट झाल्याने काहीसा दिलासा व्यक्त होत आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 51 हजार 667 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 329 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 64 हजार 527 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 1 लाख 34 हजार 445 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 91 लाख 28 हजार 267 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 93 हजार 310 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 6 लाख 12 हजार 868 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 30 कोटी 79 लाख 48 हजार 744 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

संबंधित बातम्या

भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती? नवे चकित करणारे खुलासे

कोरोनाची लस घ्या आणि स्वस्तात विमान प्रवास करा; जाणून घ्या सर्वकाही

(Drive in vaccination for 18 to 44 year olds in Thane, Inauguration by Eknath Shinde)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.