ठाण्यात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु, मंगळवारी लसीचे 10000 डोस देणार

ठाणे महापालिकेच्या वतीने ठाण्यातील 45 लसीकरण केंद्रांवर 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण 23 जूनपासून सुरु करण्यात येणार आहे.

ठाण्यात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु, मंगळवारी लसीचे 10000 डोस देणार
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांतून सूट

ठाणे : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महापालिकेच्यावतीने 45 लसीकरण केंद्रांवर 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण (Vaccination) मंगळवारपासून (23 जून) सुरु करण्यात येणार आहे. मंगळवारी 10 हजार लसीचे डोस दिले जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. (Vaccination of 18-year-olds begins in Thane, 10,000 doses will be given on Tuesday)

ठाणे महापालिकेच्या वतीने 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे ‘वॉक इन’ आणि ऑनलाईन नोंदणी पद्धतीने दिनांक 19 जूनपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. लसीच्या अपुऱ्या साठयामुळे 18 वर्षांवरील तरुणांचे लसीकरण काही दिवस बंद करण्यात आले होते. परंतु राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार 23 जूनपासून महापालिकेच्या केंद्रावर लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार उद्या महापालिकेच्या एकूण 45 लसीकरण केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत 10 हजार लसीचे डोस देण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

दरम्यान दर मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी सर्वच लसीकरण केंद्रावर 45 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन देखील महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

तरुणांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपणार

18 वर्षावरील तरुणांची गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपणार असून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. उद्यापासून महापालिकेच्या 45 लसीकरण केंद्रावर लस देणे सुरु होणार आहे. शिक्षण, नोकरी तसेच व्यवसाय यानिमित्त तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून जास्तीत जास्त तरुणांनी या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

प्रशासन सज्ज

राज्य शासनाने 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्याबाबत निर्देश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे. शहरात युवा वर्गाची संख्या जास्त असून प्रत्येक युवकाने उद्यापासून सुरु होणाऱ्या लसीकरणाचा लाभ घेवून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

इतर बातम्या

सरकार कोरोनाला घाबरत नसून विरोधकांना घाबरतंय; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

मीरा-भाईंदर भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर, जिल्हाध्यक्षपदी रवी व्यास यांच्या निवडीवरुन भाजपचे 40 नगरसेवक नाराज

(Vaccination of 18-year-olds begins in Thane, 10,000 doses will be given on Tuesday)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI