सोन्याच्या दरात तेजी, चांदी झाली स्वस्त: जाणून घ्या आजचे भाव

| Updated on: Jan 31, 2022 | 5:57 PM

सराफा बाजारानुसार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदी स्वस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याचे पहायला मिळाले होते.

सोन्याच्या दरात तेजी, चांदी झाली स्वस्त: जाणून घ्या आजचे भाव
सोन्याचे दर
Follow us on

नवी दिल्ली : सराफा बाजाराच्या ( Bullion Market) वतीने सोन्या,चांदीचे नवे दर (New rates for gold and silver) जाहीर करण्यात आले आहेत. सराफा बाजारानुसार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदी स्वस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याचे पहायला मिळाले होते. शुक्रवारच्या तुलनेत सोमवारी सकाळी 24 कॅरेट (24 carats) सोन्याच्या दरात प्रति तोळा 133 रुपयांची वाढ झाली. मात्र दुसरीकडे चांदी प्रति किलो मागे 322 रुपयांनी स्वस्त झाली आहे. भारतीय सराफा बाजारानुसार आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति तोळा 48048 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 47915 इतका होता. त्यामध्ये आज 322 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलोमागे 322 रुपयांची घसरण झाली असून, चांदीचे दर 61220 रुपयांवर स्थिरावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ उतार होत असल्याचे पहायला मिळत आहे. दर सतत कमी अधिक होत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे.

22  कॅरट सोन्याचे दर देखील वधारले

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशने दिलेल्या माहितीनुसार 22 कॅरट सोन्याच्या किमतीमध्ये देखील आज वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शुक्रवारच्या तुलनेमध्ये या आठवड्यात सोमवारी सोने हे 133 रुपयांनी महागले आहे. एकीकडे सोने वाढले आहे, तर दुसरीकडे चांदी मात्र स्वस्त झाली आहे. 2020 च्या ऑगस्ट महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडले होते. सोन्याची किंमत प्रति तोळा 56 हजारांवर पोहोचली होती. मात्र त्यानंतर सोन्याची किंमत सातत्याने कमी होत गेली. 2021 च्या ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 44 हजारांवर आले होते. मात्र आता पुन्हा एकदा यामध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे.

सोन्यातील गुंतवणूक झाली कमी

सोन्याचे दर सातत्याने अस्थिर असल्याचे पहायला मिळत आहेत. सोन्याचे दर सातत्याने कमी जास्त होत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेकजण आपली सोन्यातील गुंतवणूक कमी करून अन्य पर्याय निवडत आहेत. गेल्या वर्षी डिंसेबरपर्यंत सोन्यातील गुंतवणूक मोठ्याप्रमाणात कमी झाली होती. मात्र आता लग्नसराईचा हंगाम असल्याने काही प्रमाणात सोन्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने भावात देखील तेजी दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम; सेन्सेक्स वधारला, निफ्टीमध्ये देखील वाढ

Economic Survey 2022 : जाणून घ्या आर्थिक सर्वेक्षणातील दहा महत्त्वाचे मुद्दे

चहा-कॉफी आणि मसाल्यांसंबंधीचे कायदे लवकरच बदलणार, मोदी सरकार ब्रिटिशकालीन नियम रद्द करणार