धनत्रयोदशीला सोन्याचे भाव वाढले, चांदीही महागली, पटापट तपासा नवे दर

| Updated on: Nov 02, 2021 | 6:24 PM

मंगळवारी धनत्रयोदशीच्या खरेदीदरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 53 रुपयांनी किंचित वाढ नोंदवली गेली. यासह राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 46,844 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. या उसळीनंतरही आज सोन्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा 9,356 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे.

धनत्रयोदशीला सोन्याचे भाव वाढले, चांदीही महागली, पटापट तपासा नवे दर
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात तेजी
Follow us on

नवी दिल्ली : धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या खरेदीमुळे आज सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली. दिल्ली सराफा बाजारात आज म्हणजेच 2 नोव्हेंबर 2021 रोजी सोन्याची किंमत 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचली. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही वाढ झाली. गेल्या ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,792 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. तर चांदीचा भाव 63,288 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही.

धनत्रयोदशीला सोने 9,356 रुपयांनी स्वस्त

मंगळवारी धनत्रयोदशीच्या खरेदीदरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 53 रुपयांनी किंचित वाढ नोंदवली गेली. यासह राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 46,844 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. या उसळीनंतरही आज सोन्याच्या विक्रमी उच्चांकापेक्षा 9,356 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमची सर्वोच्च पातळी गाठली होती. त्याच वेळी आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात कोणताही मोठा बदल झाला नाही आणि तो 1,793 डॉलर प्रति औंसवर पोहोचला.

चांदीचा आजचा नवा भाव

चांदीच्या दरातही आज वाढ दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा भाव अवघ्या 45 रुपयांनी वाढून 63,333 रुपये प्रति किलोवर बंद झाला. त्याच वेळी आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 23.95 डॉलर प्रति औंसवर कायम आहे.

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर तपासा

सोन्याचे हे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.

सोन्याची शुद्धता कशी तपासता येईल?

आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलेय. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

सोन्याचे भाव का वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, आज कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत स्थिरता होती. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

कोटक सिक्युरिटीजचं छोट्या गुंतवणूकदारांना गिफ्ट, आता मोफत व्यवहार करता येणार

Gold Price : आनंदाची बातमी! धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर