AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price : आनंदाची बातमी! धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

आज धनत्रयोदशीचा सण आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold/Silver Price) मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर वायदा सोने 0.17 टक्क्यांनी घसरले. तर डिसेंबर वायदा चांदीचा भाव 0.25 टक्क्यांनी घसरला आहे.

Gold Price : आनंदाची बातमी! धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 10:58 AM
Share

मुंबई : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold/Silver Price) मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर वायदा सोने 0.17 टक्क्यांनी घसरले. तर डिसेंबर वायदा चांदीचा भाव 0.25 टक्क्यांनी घसरला आहे.

अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे आणि कोविड-19 च्या केसेसमध्ये घट झाल्यामुळे ज्वेलर्स धनत्रयोदशी-दिवाळी दरम्यान जोरदार विक्रीची अपेक्षा करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानेही खरेदी जोरदार होण्याची अपेक्षा आहे. देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव 10 रुपयांनी घसरून 46,673 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, कमकुवत जागतिक ट्रेंडमुळे हे घडले. मागील व्यवहारात मौल्यवान धातू 46,683 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. सोमवारी चांदीचा भावही 230 रुपयांनी घसरून 63,014 रुपये प्रति किलोवर आला होता. मागील व्यापारात त्याची किंमत 63,244 रुपये प्रति किलो होती.

हे अत्यंत महत्वाचे

जर एखाद्या व्यक्तीने या मर्यादेपेक्षा जास्त सोने घरात ठेवले असेल. तर त्यांना त्या सोन्यामागील उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागेल. जर सोने मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला उत्पन्नाचा स्रोत, गुंतवणुकीचा पुरावा तयार ठेवावा लागतो. ज्याच्या मदतीने तुम्ही आयकर रिटर्नमध्ये गुंतवणुकीचा स्रोत सांगू शकता. भेटवस्तूंमध्ये मिळालेल्या सोन्यासाठी तुम्हाला कोणता पुरावा ठेवावा लागेल हे तुम्हाला टॅक्स इनव्हॉइसबद्दल समजून घ्यावे लागेल. यासाठी तुम्हाला भेट पावती ठेवावी लागेल.

संबंधित बातम्या : 

स्वप्नांच्या शहरात स्वप्नातलं घर, गोरेगावात एकूण 787 कोटींचे फ्लॅट्सही विक्री, लॅविश लाईफ, हायप्रोफाईल सुविधांना प्रचंड प्रतिसाद

Dhanteras 2021: सोने खरेदी करताना आवर्जून ‘हा’ नियम लक्षात ठेवा नाहीतर धनत्रयोदशीला पोलिस येतील घरी!

70 हजार गुंतवून सुरू करा व्यवसाय, लाखोंच्या कमाईची संधी, सरकार 30% सबसिडी देणार

(Gold Price A big drop in the price of gold on the day of Dhanteras)

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला