Gold Rate : चांदीचा भाव 90 हजारांनी वाढला, सोन्याचा भाव तर तब्बल…वाचा ताजा भाव काय?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव सातत्याने वाढत आहे. नव्या वर्षात चांदीचा भाव तब्बल 90 हजार रुपयांनी वाढला आहे. सोन्याच्या भावातही अशीच वाढ झाली आहे.

Gold Rate : चांदीचा भाव 90 हजारांनी वाढला, सोन्याचा भाव तर तब्बल...वाचा ताजा भाव काय?
gold rate
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 24, 2026 | 11:55 PM

Gold And Silver Rate Today : जगभरात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे. नवे वर्ष सुरू होऊन अद्याप महिना झालेला नाही, तरीदेखील 1 जानेवारी रोजीपासून सोन्याचा भाव तब्बल 22 हजार रुपयांनी वाढला आहे. तर चांदीनेदेखील चांगलीच गती पकडली असून या धातूचा भाव गगनाला भिडला आहे. दरम्यान, आता हे दोन्ही धातू भविष्यात नेमकी किती मजल मारणार असे विचारले जात आहे. सोबतच सध्याची स्थिती पाहता सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का? असाही प्रश्न काही लोकांना पडला आहे.

सोने-चांदीच्या दरात किती बदल झाला?

चांदीबाबत बोलायचे झाले तर 1 जानेवारी 2026 पासून चांदीचा भाव 90 रुपयांपेक्षा जास्त किमतीने वाढला आहे. 1 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच भाव 1 लाख 33 हजार 151 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 1 लाख 21 हजार 966 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 99 हजार 863 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 1 जानेवारी 2026 रोजी चांदीचा भाव 2 लाख 27 हजार 900 रुपये प्रति किलो होता.

23 जानेवारी रोजी चांदी, सोन्याचा भाव काय?

23 जानेवारी 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 55 428 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 42 हजार 272 रुपये तर 18 कॅरेट सोन्याच भाव 1 लाख 16 हजार 571 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 जानेवारी 2026 रोजी चांदीचा भाव 2 लाख 18 हजार 960 रुपये प्रति किलो होता.

म्हणजेच चांदीचा भाव 24 दिवसांत साधारण 90 हजार रुपयांनी तर सोन्याचा भाव साधारण 22 हजार रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे भविष्यातही हे दोन्ही धातू नेमकं काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)