
भारताने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर धडक कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला. दोन्ही बाजूने ड्रोन, मिसाईलचा मारा दिसून आला. या वाढलेल्या ताण तणावात सोन्याने मोठी झेप घेतली. सोने प्रति 10 ग्रॅम 4000 रुपयांनी महागली. सीमेवरील तणावाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावर दिसून आला. त्यापूर्वी सोन्यात काही दिवस घसरण दिसली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरच नाही तर स्थानिक सुवर्ण पेठेतही सोन्याच्या किंमतीत उसळी दिसली. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव काय?
MCX वर असा बदलला भाव
वायदा बाजारात MCX वर सोन्याच्या किंमतीत बदल दिसला. 2 मे रोजी 5 जूनसाठी संभावित बाजारात 999 शुद्ध सोन्यासाठी वायदा किंमत 92,637 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव होता. तर शुक्रवारी 9 मे रोजी सोन्याचा भाव वाढला. तो 96,535 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. एका आठवड्यात सोने प्रति 10 ग्रॅम 3,898 रुपयांनी महागले.
सराफा बाजारात किती वाढला भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 2 मे रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भावा प्रति 10 ग्रॅम 93,954 रुपये इतका होता. तर 9 मे रोजी या किंमतीत वाढ दिसून आली. प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 96,420 रुपयांवर पोहचली. म्हणजे गेल्या आठवडाभरात सोने प्रति 10 ग्रॅम 2466 रुपये महागले.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 96,420, 23 कॅरेट 96,282, 22 कॅरेट सोने 94,100 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 78,100 रुपये, 14 कॅरेट सोने 62,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,686 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते