Gold Rate Today : सोने-चांदीच्या घसरणीला ब्रेक; दोन्ही धातु चमकले, इतक्या वाढल्या किंमती
Jalgaon Sarafa Market : गेल्या आठवड्यात इराण-इस्त्रायल युद्धाला विराम लागताच सोने आणि चांदीत मोठी घसरण दिसून आली. सोने लाखांच्या खाली घसरले. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. या आठवड्याच्या मध्यंतरात दोन्ही धातुनी उसळी घेतली.

गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला होता. इराण-इस्त्रायल युद्धाला विराम लागल्यानंतर दोन्ही धातुत मोठी घसरण झाली होती. सोने लाखांच्या खाली उतरले होते. तर चांदीतही पडझड दिसून आली होती. पण आता दोन्ही धातुच्या किंमती उसळल्या आहेत. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सोने आणि चांदीने लाखांचा टप्पा ओलांडला आहे. काय आहेत या धातुच्या किंमती, जाणून घ्या.
सराफा बाजारात दोन्ही धातुची काय किंमत?
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे.चार दिवसानंतर सोन्याच्या दरात तब्बल १४०० रुपयांनी वाढ झाली असून सोने पुन्हा १ लाखांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर आता १ लाख ५२८ रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीतही १ हजार रुपयांनी वाढ झाली असून चांदीचे दर १ लाख १० हजार २१० रुपयांवर पोहोचले आहेत. इस्रायल-इराण युद्धबंदीच्या घोषणेनंतर सोन्याचे दर १ लाखांच्या खाली घसरले होते. या दरवाढीमागे ट्रम्प सरकारने टेरिफ धोरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू केल्याचे कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
२ जुलै रोजी वायदे बाजारात काय किंमती?
MCX, वायदे बाजारात २ जुलै रोजी १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७,२५१ रुपये होता. तर इंडियन बुलियन्स असोसिएशन्सनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ९७,४६० रुपये तर २२ कॅरेट सोने ८९,३३८ रुपये प्रति १० ग्रॅम असा भाव होता. एक किलो चांदीचा भाव १,०६,६७० रुपये होता.
२० वर्षात तुफान परतावा
२००५ मध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ७,६३८ रुपये इतका होता. तर जून २०२५ पर्यंत तो १ लाखांच्या वर वाढला. म्हणजे गेल्या २० वर्षांत भावात १२०० टक्क्यांहून अधिकची वाढ झाली. तर चांदीने या काळात ६६८ टक्क्यांचा परतावा दिला. ज्या ग्राहकांनी सोन्यात त्यावेळी गुंतवणूक केली. त्यांना आता मोठा फायदा झाला आहे.
मुंबईमध्ये सराफा बाजारात सोने ९७,२९० रुपये तर चांदी १,०६,१४० रुपयांवर होते. तर दिल्लीमध्ये सोन्याचा भाव ९७,१३० रुपये, चांदी १,०५,९५० रूपये, कोलकत्तामध्ये १० ग्रॅम सोने ९७,१७० रुपये तर चांदी १,०६,०१० रुपये असा भाव आहे. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात दोन्ही धातुनी चांगलीच उसळी घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सोने खरेदीला थोडा ब्रेक लागला आहे.
