AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Gold Price : खरेदीची करा लगबग! सोन्याने गाठला तीन आठवड्यांचा नीच्चांक

Today Gold Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने उच्चांक गाठल्यानंतर देशात किंमतींनी पुन्हा गिरकी घेतली आहे. सोन्याचे दर जवळपास गेल्या पाच आठवड्यातील नीच्चांकी स्तरावर पोहचले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सोन्यात गुंतवणुकीची संधी आहे.

Today Gold Price : खरेदीची करा लगबग! सोन्याने गाठला तीन आठवड्यांचा नीच्चांक
| Updated on: Feb 18, 2023 | 10:18 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने उच्चांक गाठल्यानंतर पुन्हा गिरकी घेतली आहे. सोन्याचे दर जवळपास गेल्या तीन आठवड्यातील नीच्चांकी स्तरावर पोहचले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या (Federal Reserve Bank) कडक धोरणांचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे सोन्याचा भावात बदल दिसून येत आहे. वायदे बाजारात (Commodity Market) सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर, 58,847 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. पण एप्रिल महिन्यातील सौद्यासाठी हा दर गेल्या शुक्रवारी तीन आठवड्यांच्या नीच्चांकी पातळीवर पोहचला आहे. गेल्या आठवड्यापेक्षा सोन्याचा भाव (Gold Price) वायदे बाजारात 525 रुपयांनी घसरला आहे. हा भाव आता 56,780 रुपयांहून 56,255 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. अमेरिकन केंद्रीय बँकेच्या डॉलर मजबुतीसाठीच्या प्रयत्नांना यश आल्याने सोन्यावर दबाव वाढला आहे. भारतीय सराफा बाजारावर ही त्याचा परिणाम दिसून येईल. गेल्या जानेवारी महिन्यात भारतात सोन्याची आयात घटल्याने चिंता वाढली आहे.

गुडरिटर्न्सनुसार, सोन्याचा दरात (Gold Price) दोन दिवसांत मोठी घसरण झाली. आकडेवारीनुसार, देशातील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्यात 400 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 430 रुपयांची घसरण दिसून आली. आज ही सोन्याचा भावात काही ठिकाणी घसरण दिसून आली.

या 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने विक्रम नोंदविला होता. सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. सोन्याने 58,000 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सोन्यात सातत्याने घसरण होत आहे. उच्चांकी दरापासून सोने जवळपास 2000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे गुंतवणुकीची मोठी संधीही उपलब्ध झाली आहे.

गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपयांहून 51,800, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपयांहून 56,510 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,800 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,800 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,510 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,830 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,540 रुपये आहे.

यावर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2023 रोजी 22 कॅरेट सोन्याच्या भाव 50,600 रुपये होता. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 55,200 रुपये होता. 31 जानेवारी 2023 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 52,500 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,270 रुपये झाला होता. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

Follow Us
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर