Gold Silver Price : गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, सोन्याच्या भावात घसरण, चांदीच्या किंमतीतही कमालीचा फरक, जाणून घ्या आजचा भाव

| Updated on: Jan 08, 2023 | 4:36 PM

Gold Silver Price : आज सोने-चांदी खरेदीची चांगली संधी आहे.

Gold Silver Price : गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, सोन्याच्या भावात घसरण, चांदीच्या किंमतीतही कमालीचा फरक, जाणून घ्या आजचा भाव
Follow us on

नवी दिल्ली : सोने-चांदीला आज हुडहुडी भरली. देशभरात थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतासह देशाच्या इतर भागात आणि महाराष्ट्रातही थंडीने रंग दाखविला. त्यातच सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Rate) आज घसरण झाली. गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीचा तोरा कायम आहे. या दोन्ही मौल्यवान धातूमध्ये दरवाढीची (Price Hike) जणू स्पर्धाच लागली आहे. पण रविवारी सोने-चांदीच्या किंमतींनी थोडी विश्रांती घेतली आहे. सोन्यासह चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे.

भारतात तुळशीच्या लग्नानंतर विवाह कार्याची बोलणी सुरु होते. लग्न तिथीचा शोध सुरु होतो. वधू-वरांचे परिचय मेळावे घेण्यात येतात. आता एका आठवड्यानंतर मकर संक्रांत आहे. 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांत आहे. त्यानंतर देशात लग्न सोहळ्याची लगबग सुरु होईल.

आज बऱ्याच दिवसानंतर सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. गुंतवणूकदार आणि खरेदीदारांना सुवर्णसंधी मिळाली आहे. उच्चांकी पोहचलेल्या सोन्यात आज प्रति 10 ग्रॅम 613 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या किंमतीतही घसरण नोंदवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. नवीन वर्षात तर सोन्याने कमालीची उसळी घेतली. सोन्याने उच्चांकी दर नोंदवला. येत्या काही दिवसात सोने 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

परंतु, आज सोने-चांदीच्या किंमतींनी ब्रेक घेतला. दोन्ही धातूंच्या दरवाढीला आज ब्रेक लागला. रविवारी सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांसह खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.