Gold Rate Today : वीकेंड जवळ येतानाच गोल्डन न्यूज, सोन्याचे भाव चांगलेच घसरले; खरेदीआधी टाका किमतींवर नजर

Gold Rate Today 17 July 2026 Latest News Updates in Marathi : देशांतर्गत सोन्याची मागणी सध्या स्थिर आहे, मात्र जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण होत असल्याचा परिणाम देशांतर्गत दरांवरही दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती ?

Gold Rate Today : वीकेंड जवळ येतानाच गोल्डन न्यूज, सोन्याचे भाव चांगलेच घसरले;  खरेदीआधी टाका किमतींवर नजर
17 जुलै रोजी सोन्याची किंमत किती ?
| Updated on: Jul 17, 2026 | 9:13 AM

सोनं-चांदी हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. समारभं, सण, गुतंवणूक म्हणून सोन्याची ,चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. मात्र सध्या वाढलेल्या भावांमुळे खरेदीचा कल कमी झाला होता. मात्र शुक्रवारचा दिवस, 16 जुलैची सकाळी ही ग्राहकासांठी दिलासादायक ठरताना दिसत आहे. कारण सोन्याचे-चांदीचे नवे दर समोर आले असून गुड न्यूज आहे. देशात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. बहुतांश शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव कमी झाले आहेत. 17 जुलैच्या सकाळी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून 1,43,430 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मुंबई आणि कोलकाता येथे हा दर 1,43,280 रुपये तर चेन्नईमध्ये सोन्याची किंमत 1,43,450 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 4,030.84 डॉलर प्रति औंसवर आहे. व्यापाऱ्यांच्या मते, देशांतर्गत सोन्याची मागणी सध्या स्थिर आहे, मात्र जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण होत असल्याचा परिणाम देशांतर्गत दरांवरही दिसत आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील सोन्याच्या किंमती

दिल्ली

24 कॅरेट: 1,43,430 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,31,490 रुपये प्रति 10 ग्रॅम

मुंबई आणि कोलकाता

24 कॅरेट: 1,43,280 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,31,340 रुपये प्रति 10 ग्रॅम

चेन्नई

24 कॅरेट: 1,43,450 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,31,490 रुपये प्रति 10 ग्रॅम

पुणे आणि बंगळुरू

24 कॅरेट: 1,43,280 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट: 1,31,340 रुपयेप्रति 10 ग्रॅम

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 131490 143430
मुंबई 131340 143280
अहमदाबाद 131390 143330
चेन्नई 131490 143450
कोलकाता 131340 143280
हैदराबाद 131340 143280
जयपुर 131490 143430
भोपाळ 131390 143330
लखनऊ 131490 143430
चंदीगड 131490 143430

दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत भारताची सोन्याची आयात 11.01 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती 7.49 अब्ज डॉलर होती.

चांदीचे दर किती ?

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण कायम आहे. 17 जुलैच्या सकाळी चांदीचा दर 2,34,900 रुपये प्रति किलो इतका आहे. सराफा बाजार आणि उद्योगांकडून खरेदी कमी झाल्याने चांदीच्या किमतीवर दबाव आहे. याशिवाय, गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या नफावसुलीमुळे (प्रॉफिट बुकिंग)ही दर खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव 56.79 डॉलर प्रति औंस आहे. देशातील सोने-चांदीचे दर हे स्थानिक मागणी-पुरवठ्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवरही अवलंबून असतात.

Follow Us