
सोनं-चांदीच्या दरांपासून (Gold-Silver Rates) ते सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही शेअर बाजार निर्देशांकांपर्यंत (Sensex-Nifty), गुरुवारी सुरुवातीपासूनच मंदीचं चित्र दिसत आहे. काल बाजार बंद होईपर्यंत वेगाने वाढणारी चांदी, आज मात्र एमसीएक्स उघडताच अचानक 5000 रुपयांपेक्षा जास्त प्रति किलोने स्वस्त (Silver Price Fall) झाली, तर सोन्याचीही काही वेगळी स्थिती नव्हती. सोन्याचे दरही (Gold Rate Fall) कोसळले. तर दुसरीकडे सेन्सेक्स-निफ्टीची हालचाल बदललेली दिसत होती, खरंतर सकाळी दोन्हीही जोरदार गतीने उघडले, परंतु काही मिनिटांतच ही गती मंदावली आणि ते रेड झोनमध्ये आले.
मार्केट उघडताच चांदीची किंमत इतक्या हजारोंनी घटली
गुरुवारी कमोडिटी मार्केटमध्ये सकाळी मंदी दिसली. एमसीएक्सच्या सुरुवातीच्या काळात चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 2,78,364 पर्यंत घसरले, काल बाजार बंद होताना हेच दर 2,78,364 रुपये प्रति किलोग्रॅम होते. त्या हिशोबाने 1 किलो चांदीचे दर 5804 रुपयांनी कमी झाले. 29 जानेवारी रोजी चांदीच्या किमतीने 4 लाख 20 हजार 048 हा उच्चांक गाढला होता, मात्र आता ती एकूण 1 लाख 47 हजार 488 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सोन्याची झळाळीही फिकी
मार्केटमध्ये चांदीसोबतच सोन्याच्या किमतीतही घसरण झाली. 2 एप्रिल रोजी संपणारा एमसीएक्स सोन्याचा वायदा बाजार, काल म्हणजेच बुधवारी 1,61,145 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरावर बंद झाला. मात्र आज सकाळी मार्केट उघ़ताच सोनं घसरून 1,60,516 वर पोहोचलं, म्हणजेच 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं एकूण 629 रुपयांनी स्वस्त झालं. जर आपण सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीकडे पाहिले तर चांदीप्रमाणेच सोन्यानेही 29 जानेवारी रोजी प्रति 10 ग्रॅम साठी 1,93,096 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत या मौल्यवान पिवळ्या धातूचा भाव 32,580 रुपयांनी घसरला आहे.
तुमच्या शहरात किती दर ?
मुंबई, कोलकाता, हैदराबाद, केरळ, बंगळुरू, पुणे, नागपुर, भुवनेश्वर, विजयवाड़ा इथे आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 16, 168 रुपये ( 1 ग्रॅम), 22 कॅरेट सोन्याची किंमत 14,820 रुपये ( प्रति ग्रॅम) आणि 18 कॅरेटची किंमत 12,126 रुपये आहे.
तर दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुडगाव, अयोध्या, चंदीगडमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 16,183 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,835 रुपये आणि 11 कॅरेट सोन्याचा भाव 12,141 रुपये प्रति ग्रॅम आहे.