
आज 26 जानेवारी 2026… देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन. आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आज, पहिल्यांदाच, COMEX वर सोन्याचा भाव प्रति औंस 5000 डॉलर्स ओलांडून 5, 046.70 डॉलर्स प्रति औंस इतक्या किमतीवर पोहोचला. तर चांदीचा दर प्रति औंस 106.81 डॉलर्सवर पोहोचला. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्यानंतर, येत्या आठवड्यातही सोन्या-चांदीच्या वाढत्याच राहू शकतील, असा अंदाज होता. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हा ट्रेंड स्पष्ट दिसत आहे.
भारतात सोन्याचे भाव
आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे मल्टी कमॉडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर तर कोणतेही व्यवहार होणार नाहीत. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. गेल्या शुक्रवारी, एमसीएक्स एक्सचेंजवर प्रति 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोला सोन्यासाठी 1 लाख 55 हजार 963 रुपये इतका भाव होता. तर चांदीची किंमत प्रती किलोसाठी 3 लाख 34 हजार 600 रुपये इतकी होती. जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई सारख्या भारतीय शहरांमध्ये आज सोने आणि चांदीची लेटेस्ट दर किती आहेत, ते जाणून घेणं महत्वाचं ठरेल. किंमत काय आहे ते जाणून घ्या.
सोन्या-चांदीचे भाव किती ?
आज, भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति किलोग्रॅम1 लाख 60 हजार 250 रुपये इतकी झाली आहे. शिवाय, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 1 लाख 46 हजार 890 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅमसाठी 1 लाख 20 हजार 180 रुपये इतकी आहे. तर 1 किलो चांदीसाठी आजचा दर 3 लाख 34 हजार 900 रुपये इतका आहे.
– दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,60,400 रुपये झाला. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,47,040 रुपये झाला.
– आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम1,60,250 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,46,890 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,20,180 रुपये आहे.
– आज हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,60,250 रुपये इतका आहे.
– तर आज चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम1,59,480 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,47,490 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,22,990 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,60,300 रुपये आहे.
– तर कोलकाता येथे आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 60,250 रुपये इतका आहे.
सोन्या-चांदीच्या दरात वाढ का ?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर सर्वाधिक परिणाम होत आहे. त्यांनी अलीकडेच कॅनडावर 100% कर लादण्याची धमकी दिली होती. शिवाय, अमेरिकन सरकारची धोरणे आणि फेडचा वस्तूंवरील वाढता दबाव यांचा देखील सोन्या-चांदीच्या किमतींवर परिणाम होत आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1800 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 64 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 60 हजार 500 रुपयांवर पोहोचलेत. सोन्या चांदीच्या दरात घसरणींनतर पुन्हा मोठी वाढ झाली आहे.