
सोन्याच्या किमती ऐकल्या की फक्त डोळे विस्फारणं सुरू असतं हल्ली. मंगळवारीही तोच ट्रेंड कायम असून, आज म्हणजेच 27 जानेवारी रोजी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 5 फेब्रुवारी 2026 रोजी एक्सपायरी डेट असलेले सोन्याचे फ्युचर्स प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 58 हजार 674 रुपयांवर उघडले. मागील ट्रेडिंगच्या दिवशी MCXवर सोनं हे 1 लाख 56 हजार 037 वर बंद झालं होतं.
पण तीन दिवसांनी मार्केट उघडल्यावर , आज ( मंगळवार) सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी 5 फेब्रुवारी रोजी एक्सपायरी असलेले एमसीएक्स वर सोने 1 लाख 58 हजार 310 वर व्यवहार करत होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या किमतीत 2 हजार 300 रुपयांची वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात एमसीएक्सवर सोनं हे सोने 1लाख 59 हजार 820 इतक्या उच्चांकावर पोहोचले होते.
तर एमसीएक्स वर 5 मार्च 2026 ची एक्सपायरी असलेली चांदी ही 3 लाख 56 हाजर 661 रुपये प्रति किलो या रेटवर होती. गेल्या आठवड्यात बंद झालेल्या भावाच्या तुलनेत आज 21 हजारांची वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात MCX वर चांदीने 3 लाख 59 800 रुपयांचा उच्चांक गाठला. आज तुमच्या शहरातील सोने आणि चांदीचे लेटेस्ट दर कितीतेही जाणून घेऊया…
तुमच्या शहरात सोन्या-चांदीचा भाव काय ?
दिल्लीत सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)
24 कॅरेट – 1,62,100 रुपये
22 कॅरेट – 1,48,600 रुपये
18 कॅरेट – 1,21,610 रुपये
मुंबईमध्य सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)
24 कॅरेट – 1,61,950 रुपये
22 कैरेट – 1,48,450 रुपये
18 कॅरेट – 1,21,460 रुपये
चेन्नईत सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)
24 कॅरेट – 1,63,200 रुपये
22 कॅरेट – 1,49,600 रुपये
18 कॅरेट – 1,24,750 रुपये
कोलकातामध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)
24 कॅरेट – 1,61,950 रुपये
22 कॅरेट – 1,48,450 रुपये
18 कॅरेट – 1,21,460 रुपये
अहमदाबादमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)
24 कॅरेट – 1,62,000 रुपये
22 कॅरेट – 1,48,500 रुपये
18 कॅरेट – 1,21,510 रुपये
लखनऊमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)
24 कॅरेट – 1,62,100 रुपये
22 कॅरेट – 1,48,600 रुपये
18 कॅरेट – 1,21,610 रुपये
पटना मध्ये किती आहे सोन्याचा भाव (प्रति 10 ग्राम)
24 कैरेट – 1,62,000 रुपये
22 कॅरेट – 1,48,500 रुपये
18 कॅरेट – 1,21,510 रुपये
हैदराबादमध्ये सोन्याचे दर (प्रति 10 ग्राम)
24 कॅरेट – 1,61,950 रुपये
22 कॅरेट – 1,48,450 रुपये
18 कॅरेट – 1,21,460 रुपये
आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. या मौल्यवान धातूंची खरेदी पूर्वीपेक्षा जास्त महाग होईल. जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील लेटेस्ट किमती आधी जाणून घ्या.