AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच सोमवारी खुशखबर ! सोन्याची पुन्हा घसरण, तुमच्या शहरात किंमत किती ?

Gold Price Today 3 August 2026 Latest News Updates in Marathi : सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे. आज 3 ऑगस्ट रोजी देशातील प्रमुख शहरांत 1 तोळा सोन्याचे दर किती ते जाणून घेऊया.

Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच सोमवारी खुशखबर ! सोन्याची पुन्हा घसरण, तुमच्या शहरात किंमत किती ?
3 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर
| Updated on: Aug 03, 2026 | 8:38 AM
Share

20206 या वर्षातील 8व्या अर्थात ऑगस्ट महिन्याला सुरूवात झाली असून नव्या महिन्याचा पहिला सोमवार ग्राहकांसाठी खाश खबर घेऊन आला आहे. लवकरच सणासुदीला सुरूवात होणार असून त्यापूर्वी सोन्याचे भाव चांगलेच खाली आलेले पहायला मिळाले आहेत. ऑगस्टच्या पहिल्याच सोमवारी देशांतर्गत सराफा बाजारात ग्राहकांसाठी दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार अनुभवणाऱ्या सोन्याच्या किमतीत आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर कमी झाले असून, गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.

आठवडाभरात सोन्याचे दर किती घसरले?

बाजारातील आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 710 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 750 रुपयांनी कमी झाला आहे. सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीतील ही घसरण ग्राहकांसाठी सकारात्मक मानली जात आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर कमी झाले असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्पॉट गोल्डची किंमत 4,067.06 डॉलर प्रति औंस इतकी झाली आहे.

प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर

राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,44,360 रुपये प्रति 10 ग्रॅम असून, 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,32,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,44,210 रुपये प्रति 10 ग्रॅम असून, 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर सर्वाधिक असून 10 ग्रॅमची किंत 1,44,600 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याच्या 1 तोळ्याची किंमत 1,32,550 रुपये इतकी आहे. पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्येही 24 कॅरेट सोनं 1,44,210 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोनं 1,32,190 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 132240 144360
मुंबई 132190 144210
अहमदाबाद 132240 144260
चेन्नई 132550 144600
कोलकाता 132190 144210
हैदराबाद 132190 144210
जयपुर 132240 144360
भोपाळ 132240 144260
लखनऊ 132240 144360
चंदीगड 132240 144360

चांदीतही मोठी घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. आज सकाळी देशांतर्गत बाजारात चांदीचा दर 2,34,900 रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला. गेल्या एका आठवड्यात चांदीच्या दरात 5,000 रुपयांची घट झाली असून, ही घसरण गुंतवणूकदारांसाठी आणि मोठ्या प्रमाणात चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे. आगामी काळात जागतिक आर्थिक घडामोडी, अमेरिकेचे व्याजदर, डॉलरची स्थिती आणि भू-राजकीय परिस्थिती यांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी