Gold Price Today | फक्त 33 हजार रुपयांपेक्षा कमी दरात 10 ग्रॅम सोनं, जाणून घ्या कसं?

सोने-चांदीच्या दरात दररोज बदल होत असतो. मात्र आता सर्वसामांन्यांना स्वसतात सोनं खरेदी करण्याची संधी आहे.

Gold Price Today | फक्त 33 हजार रुपयांपेक्षा कमी दरात 10 ग्रॅम सोनं, जाणून घ्या कसं?
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 4:12 PM

Gold-Sliver Rate Today | सोन्यात प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक करत असतो. तर कुणी दागिन्यांसाठी सोने खरेदी करतो. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सोन्याचे दर वाढतायेत. त्यामुळे इच्छा असूनही वाढीव दरांमुळे मन मारुन थोडंफारच सोनं खरेदी करता येतं. मात्र आता मन मारायची गरज नाही. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मात्र त्यानंतरही फक्त 33 हजार रुपयांमध्ये सोनं खरेदी करण्याची संधी आली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज सोने-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात .30 ने वाढल्याने 10 ग्रॅमचा दर हा 55 हजार 888 रुपये इतका आहे. तर चांदीच्या दरात 0.42 वाढ झाली आहे. त्यामुळे 1 किलो चांदीचा भाव हा 64 हजार 674 इतका झालाय.

33 हजार रुपयात सोनं

सोन्याच्या शुद्धतेची मोजणी ही कॅरेट या एककात केली जाते. यामध्ये 24, 23, 22, 18 आणि 14 कॅरेट सोनं मिळतं. 24 कॅरेट सोनं फार शुद्ध असतं. ते फार नाजूक असल्याने त्याचा वापर हा दागिने बनवण्यासाठी केला जात नाही. सोन्यात मजबूतपणा आणण्यासाठी इतर धातू त्यात मिक्स केले जातात. त्यामुळे दागिन्यांसाठी 23 आणि 22 कॅरेट सोनं वापरलं जातं. सध्या 14 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 32 हजार 820 रुपये इतका आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई आणि पुणे शहरातील सोन्याचे दर

मुंबई

6 मार्च, 51 हजार 850 रुपये प्रति तोळा, 22 कॅरेट.

6 मार्च, 56 हजार 550 रुपये प्रति तोळा, 24 कॅरेट.

पुणे

6 मार्च, 51 हजार 850 रुपये प्रति तोळा, 22 कॅरेट.

6 मार्च, 56 हजार 550 रुपये प्रति तोळा, 24 कॅरेट.

खरेदी आधी ‘ही’ खबरदारी आवश्यक

ग्राहकांची फसवणूक हा प्रकार काही नवीन नाही. सोने खरेदीसाठी प्रत्येक जण बचत करुन पैसे साठवतो. मात्र सोने खरेदी करताना ग्राहकांची फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोने खरेदी करताना काय खबरदारी घ्यायची, हे माहिती असणं महत्वाचं आहे.

सोनं खरेदी करताना दागिन्यावर हॉलमार्क आहे की नाही, हे तपासून पाहा. हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक मोबाईल app ही जारी करण्यात आलं आहे. या एपचं ‘BIS Care App’ असं नाव आहे. या एपच्या मदतीने तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकतो. तसेच सोनं खरं आहे नकली हे जाणून घेऊ शकता. सोबतच काही तक्रार असेल, तर ती ही यावरुन नोंदवू शकता.

तसेच घर बसल्याही सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल द्यावा. किंवा या नंबरवर मेसेजही करु शकता.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.