Gold Price : वायदे बाजारात सोने-चांदीची किंमत घसरली, आंतरराष्ट्रीय बाजारात ही दर कोसळले, आजचा भाव काय?

Gold Price : वायदे बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली..

Gold Price : वायदे बाजारात सोने-चांदीची किंमत घसरली, आंतरराष्ट्रीय बाजारात ही दर कोसळले, आजचा भाव काय?
सोने-चांदीचे दर काय
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 15, 2022 | 4:48 PM

नवी दिल्ली : भारतीय वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी, 15 डिसेंबर रोजी चक्र फिरली. सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price) घसरला. मल्टी कमोडिटी आणि एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा भाव (Gold Price Today) सुरुवातीच्या व्यापारी सत्रात 0.57 टक्क्यांनी घसरला. वायदे बाजारात चांदीही फिक्की पडली. चांदीची किंमत (Silver price Today) कालच्या भावापेक्षा 1.50 टक्के घसरली. बुधवारी MCX वर सोन्याचा दर 0.12 टक्के घसरला तर चांदीचा भाव 0.73 टक्के वधरला होता.

गुरुवारी वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव (Gold Rate Today) सकाळी 9:10 वाजता कालचा बंद भावापेक्षा 310 रुपयांनी घसरुन 54,364 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होता. आज सोन्याचा भाव सकाळच्या सत्रात 54,481 रुपये होता. काल सोन्याच्या भावात 65 रुपयांची घसरण होऊन तो 54,678 रुपयांवर बंद झाला.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीचा भाव खालच्या स्तरावर ट्रेड करत होता. चांदीत आच कमाल घसरण नोंदविण्यात आली. चांदीचा भाव (Silver rate Today) कालपेक्षा 1,037 रुपयांनी घसरला. आज चांदीचा भाव 68,265 रुपये प्रति किलोग्रॅम होता.

चांदीचा दर मध्यंतरी 68,286 रुपयांपर्यंत पोहचला. पण नंतर त्याने पुन्हा रिव्हर्स गिअर टाकला. गेल्या व्यापारी सत्रात चांदीचा वायदा बाजारातील भावाने 505 रुपयांनी उसळी घेतली आणि हा भाव 69,280 रुपयांवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या आणि चांदीचा दर घसरला होता. सोन्याचा भाव (Gold Price) गुरुवारी 0.80 टक्क्यांनी घसरला. तो 1,795.05 डॉलर प्रति औस झाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 1.40 टक्क्यांनी घसरला. चांदी 23.37 डॉलर प्रति औस झाली.

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत वृद्धी दिसून आली होती. दिल्लीत सोन्याचा दर 318 रुपयांनी वाढला आणि तो 54,913 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. हा भाव 54,595 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीत बुधवारी 682 रुपयांची वाढ होऊन हा भाव 69,176 रुपये प्रति किलो झाला.