Pakistan Gold Prices : कंगाल पाकिस्तानात काय असेल सोन्याचा भाव? तुम्हालाही बसेल धक्का, एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागतील इतके रुपये..

Pakistan Gold Prices : पाकिस्तानातील सोन्याचा दर काय ते माहिती आहे का?

Pakistan Gold Prices : कंगाल पाकिस्तानात काय असेल सोन्याचा भाव? तुम्हालाही बसेल धक्का, एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागतील इतके रुपये..
सोन्याचा दर काय?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 5:19 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानचे (Pakistan) कंगालपण काही लपलेले नाही. जगातील असे एकही श्रीमंत राष्ट्र नसेल ज्याकडे पाकिस्तानने कर्जासाठी, मदतीसाठी हात पसरवले नसतील. खाद्यान्नासह या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही (Petrol-Diesel Price) आकाशाला भिडल्या आहेत. सध्या पाकिस्तानात, तिथल्या चलनात 224 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा भाव आहे. पण या देशात सोन्याचा भाव (Gold Rate) काय आहे, ते माहिती आहे का? येथील सोन्याचा भाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकले, एवढे मात्र नक्की.

आपल्याकडे 30 हजारांच्या आसपास असलेले सोने दणकावून 55,000 हजार रुपयांच्या घरात गेल्यावर सर्वांचेच डोळे पांढरे झाले. सोन्याचा भाव अचानक एवढा वाढल्याने सर्वांनीच बोटं मोडलीत. पण सोने खरेदी कमी झाली नाही. पाकिस्तानात तर भारतापेक्षाही सोने महाग आहे. एक तोळा सोन्यासाठी इतकी रक्कम खर्च करावी लागते.

सोन्याची खरेदी पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे. गरिब जनतेला तर सोन्याची गोष्ट काढणे अवघड आहे. भारतासारखीच तेथील परिस्थिती आहे. पण भारतात अजूनही सोन्याचा भाव पाहता, किडूकमिडूक गाठिशी ठेवणारी जनता आहेच.

हे सुद्धा वाचा

जिओ टीव्हीच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये एक तोळा सोन्यासाठी 1,64,150 पाकिस्तानी रुपया मोजावा लागतो. तर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 214 रुपये आणि प्रति तोळा 250 रुपयांची वाढ झाली आहे.

या दरवाढीमुळे पाकिस्तानात सोन्याचा नवीन दर प्रति तोळा 1,64,159 पाकिस्तानी रुपया झाला आहे. तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,40,732 पाकिस्तान रुपया आहे. पाकिस्तान सराफा जेम्स आणि ज्वेलर्स असोसिएशनकडून हे भाव जाहीर करण्यात आले आहे.

तर भारतात सोन्याचा भाव 54,305 प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 67,365 रुपये प्रति किलो आहे. यावरुन पाकिस्तान आणि भारतातील सोन्याचा दरामधील फरक सहज लक्षात येतो. पण पाकिस्तान रुपया आणि भारतीय रुपया यांचे मूल्य बघता, भारतीय रुपयात हे दर कमी आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत सर्वच चलन घसरले आहेत. त्यात भारतीय रुपया ही आहे. त्यावरुन सातत्याने गदारोळ होत असतो. पण पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत खूपच घसरलेला असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे मूल्यांकन अत्यंत कमी आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.