Gold Price Today : हुश्श ! सोन्याच्या घोडदौडीला अखेर ब्रेक, उच्चांकापेक्षा सोनं अखेर स्वस्त, आज 10 ग्रॅमचे दर..

Gold Price Today 23 May Latest News Updates in Marathi: देशांतर्गत सोन्या-चांदीच्या किमतींवर देशांतर्गत घटकांचा तसेच जागतिक घटकांचा प्रभाव पडतो. गेले अनेक दिवस सोन्याची घोडदौड सुरू होती, अखेर ाज मात्र या वेगाला ब्रेक लागला आहे. सोन्याचे दर आज किती घसरले, 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार ? घ्या जाणून..

Gold Price Today : हुश्श ! सोन्याच्या घोडदौडीला अखेर ब्रेक, उच्चांकापेक्षा सोनं अखेर स्वस्त, आज 10 ग्रॅमचे दर..
| Updated on: May 23, 2026 | 9:25 AM

सोनं-चांदीतील गुंतवणूक, खरेदी कमी करणयाचा आवाहन पतंप्रधान मोदी यांनी केल्यावरही देशात सोन्याची खरेदी सुरूच होती. मात्र वाढती महागाई आणि गगनाला भिडलेले भाव यामुळे खरेदीचा उत्साह कमी झाला होता. गेल्या काही दिवसांपसून सोन्याचे दर वायू वेगाने दौडत होते, मात्र आजा दरवाढीला ब्रेक लागला असून देशभरात आता सोन्याच्या दरातील वाढ थांबली आहे. 23 मे रोजी सकाळी त्यात घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 1- ग्रॅम 1,59,650 रुपयांपर्यंत घसरला आहे. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,59,480 रुपयांपर्यंत खाली आला आहे. आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,64,900 रुपयांवर आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,522.32 डॉलर इतका आहे.

अमेरिका-इराण यांच्यातील सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू असलेल्या मध्य-पूर्वेतील संघर्षाच्या निकालावर आणि महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आता काही करार होईल की नाही, काहीतोडगा निघतो की नाही यावर व्यापारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारतीय रुपयातील अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील बदलांचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही होत आहे.

देशातील महत्वाच्या शहरांतील सोन्याचे दर

दिल्लीतील सोन्याचे दर: दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,59,630 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,46,240 रुपये आहे.

मुंबई आणि कोलकाता: मुंबई आणि कोलकातामध्ये 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,46,190 आहे तर 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,59,480 रुपये मोजावे लागतील.

चेन्नईमधील सोन्याचा भाव: 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,61,230 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,47,790 रुपये आहे.

पुणे आणि बंगळूरुमधील भाव: या दोन शहरांमध्ये 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,59,480 आणि 22 कॅरेट 10 ग्रॅम सोनं 1,46,190 रुपयांना मिळत आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 146240 159630
मुंबई 146190 159480
अहमदाबाद 146240 159530
चेन्नई 147790 161230
कोलकाता 146190 159480
हैदराबाद 146190 159480
जयपुर 146240 159630
भोपाळ 146240 159530
लखनऊ 146240 159630
चंदीगड 146240 159630

चांदीचे दर

सोन्याप्रमाणेच चांदीच्या खरेदीदारांसाठीही गुड न्यूज आहे. चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घट होत आहे. 23 मे रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलोग्राम2,84,900 रुपयांपर्यंत घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव प्रति औंस 75.87 डॉलर इतका आहे.

 

Follow Us