AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : सोने खरेदीचा विचार करताय, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Gold Silver price today : आंतरराष्ट्रीय बाजाराती तेजीचा हलकासा परिणाम सोन्या-चांदीच्या (Gold and Silver price) दरांवर दिसत आहे. सोने दरात (Gold Price today) आज दहा रुपयांची कपात झाली.

Gold Silver Price Today : सोने खरेदीचा विचार करताय, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर
सोने-चांदी भाव
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 10, 2021 | 11:37 AM
Share

मुंबई/नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजाराती तेजीचा हलकासा परिणाम सोन्या-चांदीच्या (Gold and Silver price) दरांवर दिसत आहे. सोने दरात (Gold Price today) आज दहा रुपयांची कपात झाली. जर आज तुम्हाला 22 कॅरेट सोने खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तोळ्याला 44 हजार 920 रुपये तर 24 कॅरेट सोन्यासाठी 45 हजार 920 रुपये द्यावे लागतील.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचा परिणाम MCX वर दिसत आहे. MCX वर सोने दरात 136 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. आज सकाळी बाजाराच्या सुरुवातील 10.25 वाजता MCX वरील सोन्याचा तोळ्याचा भाव 47887 रुपये इतका होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनेदरात 2.85 डॉलरने तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे सोने दर 1,834.15 रुपयांनी वधारल्याचं चित्र होतं. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर सोने दराने गाठलेला हा उच्चांक होता. दुसरीकडे चांदी दरात 0.348 डॉलरची तेजी होती.

चांदीच्या दरात मोठी वाढ

चांदीच्या दरातही आज मोठी वाढ पाहायला मिळाली. MCX वर सकाळी 10.40 च्या सुमारास जुलै डिलिव्हरीच्या चांदी दरात 834 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचा दर 72 हजार 263 वर पोहोचला.

शेअर बाजारातही तेजी

आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर सलग चौथ्या सत्रात शेअर मार्केटमध्ये तेजीचं चित्र आहे.

मे महिन्यात सोने दरात किती वाढ

डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी एमसीएक्सवरील (MCX) सोन्याचे वितरण प्रति दहा ग्रॅम 47760 रुपयांवर बंद झाले. 30 एप्रिल रोजी जून डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव (Gold Rate) 46737च्या पातळीवर बंद झाले होते. अशा प्रकारे, मे महिन्यात सोन्याच्या भावात आतापर्यंत 1023 रुपयांनी वाढ झाली आहे

संबंधित बातम्या 

Gold Rate Today: कोरोना संकटात सोने पुन्हा एकदा महागले, 10 ग्रॅम सोन्याचे भाव काय?

Gold Price Today | मे महिन्यात सोने 1000 रुपयांनी महागले, गुंतवणुकीआधी जाणून घ्या ताजे दर

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली