Gold rate today : वीकेंडला सोने खरेदीचा विचार करताय? आजचे दर पाहा

| Updated on: Dec 28, 2020 | 8:04 AM

सध्या सोन्याचे भाव स्थिरावले असून सराफा बाजारात कोणताही चढउतार दिसून आला नाही. (gold silver price today)

Gold rate today : वीकेंडला सोने खरेदीचा विचार करताय? आजचे दर पाहा
Follow us on

जळगाव : सुवर्णनगरीत म्हणजेच जळगावमध्ये मागील काही दिवसांत सोन्याच्या दरात वाढ (Gold Price) नोंदवली गेली. मात्र, सध्या सोन्याचे भाव स्थिरावले असून सराफा बाजारात कोणताही चढउतार दिसून आला नाही. सोन्याचा आजचा दर 51,410 प्रतितोळा आहे. तर चांदीच्याही दरात कोणताही बदल झालेला नसून चांदीचा दर प्रति किलो 69,208 आहे. मात्र, असे असले तरी, राज्यातील बाकीच्या जिल्ह्यांत सोने-चांदी दरामध्ये चढउतार पाहायला मिळाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. (gold silver price today latest updates)

कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या दरात मोठा चढउतार पाहायला मिळाला. जळगावमध्ये दोन दिवसांपूर्वी सोन्याचा दर 51,288 प्रतितोळा तर चांदीचा दर 69,053 प्रतिकिलो होता. सराफा बाजार थोडा स्थिरावल्याने काल (शुक्रवार 25 डिसेंबर) हा भाव 200 रुपयांनी वाढून 51,410 रुपयांवर स्थिरावला. तर चांदीच्या दरात 155 रुपयांची वाढ होऊन, शुक्रवारी हा दर 69,208 वर आला होता. जळगावमध्ये शुक्रवारी असेला हाच दर शनिवारीदेखील कायम आहे.

कोणत्या जिह्यात काय दर?

सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये सोन्याचा दर 51,410 प्रतितोळा आहे. तर चांदीचा दर प्रती किलो 69,208 नोंदवला गेला. हाच भाव नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅमसाठी 51 हजार रुपये आहे. तर नागपुरात चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून हा दर तब्बल 2 हजारांनी घसरला आहे . नागपुरात चांदीचा सध्याचा दर 67 हजार प्रती किलो आहे. नाशिकमध्ये सोने प्रतितोळा 51 हजार 100 रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा भाव प्रतिकिलो 60 हजार 300 रुपये आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात मोठी घसरण

जळगावमधील सराफा बाजाराच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात सोने-चांदी दरात मोठी घसरण झालीये. जिल्ह्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 48310 रुपयांपर्यंत घसरले असून चांदीचा भाव 50070 रुपयांवर आला आहे.

           जिल्हा                                       सोने                                    चांदी 

  • जळगाव                                  51,410                                 69,208
  • नागपूर                                    51,000                                67, 000
  •  नाशिक                                  51,100                                 60, 300
  • औरंगाबाद                              48,310                                  50,070

दरम्यान, यंदा सोन्याच्या किमतीत 28 टक्क्यांनी वाढ झालीय. तर पुढच्या वर्षीपर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होतच राहणार असल्याचे कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडी आणि कोरोना विषाणू आणि लसीच्या संदर्भात घडणाऱ्या घटना यांमुळे आगामी काही दिवसांत सोने चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळू शकतो.

संबंधित बातम्या :