Gold Silver Price Crash: काय सांगता? सोनं थेट 1 लाखांच्या खाली, लग्नसराईपूर्वी मोठी घसरण
Gold Rate Crash On 19th November 2026: दिवाळा संपताच सोन्याला उतरती कळा आल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीच्या किमती पण घसरण झाली आहे,

Gold Silver Rate Today: सोने किंवा चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. दिवाळी संपताच दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. bullion.co.in नुसार, आज, १९ नोव्हेंबर रोजी, १० ग्रॅम २४-कॅरेट सोन्याचा भाव ₹१३०,४६० पर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे, चांदीचा भाव ₹१६१,४९० प्रति किलोग्राम आहे. गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात जवळपास ₹१६,००० ची घसरण झाली आहे. दरम्यान, याच काळात चांदी ₹४५,५०० पेक्षा जास्त स्वस्त झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात, COMEX वर आज सोन्याच्या दरात ०.१४% ची किंचित वाढ होऊन तो प्रति औंस $३,७४७.३० वर पोहोचला. चांदीच्या दरातही ०.४३% ची किंचित वाढ होऊन तो प्रति औंस $४५.२६ वर पोहोचला. दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमागील प्रमुख कारणे म्हणजे अमेरिकेच्या आर्थिक धोरणांमधील संभाव्य बदल, डॉलरचे बळकटीकरण आणि अमेरिकी बॉण्ड्सवरील वाढता परतावा ही आहेत. हे घटक गुंतवणूकदारांना सोने आणि चांदीपासून दूर इतर गुंतवणूक पर्यायांकडे वळवत आहेत. सोन्यापेक्षा चांदीच्या दरात अधिक घसरण झाली आहे. याचे कारण असे की, चांदीच्या किमती अधिक चढ-उतार करतात आणि बाजारातील बदलत्या गुंतवणूकदारांच्या भावनांचा त्यावर अधिक वेगाने परिणाम होतो.
गुडरिटर्नसुसार, आजच्या सोन्याच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. मार्केट उघडताच १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३३,२५० रुपये झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव हा १,२२,१४० रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव हा एक लाखाच्या खाली उतरला आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव हा ९९,९३० रुपये आहे.
तुळशी विवाहला आता सुरुवात होणार आहे. चार दिवस या विवाहसोहळ्याचा मुहुर्त असणार आहे. या विवाहसोहळ्यापूर्वी आता ग्राहकांना जर सोनं खरेदी करायचे असेल तर त्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. लाखाच्या घरात आता सोनं पोहोचल्याने ग्राहकांना खरेदी करण्याची मोठी संधी मिळाली आहे.