
सोने आणि चांदीने ग्राहकांना पुन्हा एकदा घाम फोडला आहे. दोन्ही धातुची जोरदार घोडदौड सुरू आहे. सोन्याची 90 हजारी घोडदौड, चांदी लाखाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आता गाझा पट्ट्यात शांतता आहे. तर दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धाचा ज्वरही कमी होत आहे. पण जगावर डोनाल्ड ट्रम्प नावाचे वादळ आल्याने जागतिक व्यावसायिक आणि व्यापारी धोरण अस्थिर झाले आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे सध्या एकच गोंधळ उडाला आहे. त्याचा परिणाम दोन्ही मौल्यवान धातुच्या भावांवर दिसून येत आहे. आज किंमत इतकी, 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या (Gold Silver Price Today 11 February 2025 )
सोन्याच्या भावात 2,430 रुपयांची उसळी
मुंबईतील जव्हेरी बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा घाऊक भाव सोमवारी 85,665 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत.
परिणामी जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात तेजी निर्माण झाली असून जागतिक धातू वायदा बाजारमंच ‘कॉमेक्स’वर सोन्याचा भाव प्रति औंस 45 डॉलरने वाढून 2,932 डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला.
सोन्याची दमदार कामगिरी
गेल्या आठवड्यात सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर जवळपास 1500 रुपयांनी किंमती वधारल्या. या आठवड्यातही सोन्याने घोडदौड सुरूच ठेवली. या सोमवारी सोने 400 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा लाखाच्या उंबरठ्यावर मुक्काम
गेल्या आठवड्यात चांदीत चढउतार दिसून आला. चांदी एक हजारांनी वधारली तर एक हजारांनी स्वस्त झाली. त्यानंतर भावात मोठा बदल दिसला नाही. गेल्या चार दिवसांपासून चांदीने लाखाच्या उंबरठ्यावर मुक्काम ठोकला आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,500 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,665, 23 कॅरेट 85,322, 22 कॅरेट सोने 78,469 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,249 रुपये, 14 कॅरेट सोने 50,114 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,533 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.