
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी आल्यानंतर त्यांचे विक्षिप्त वर्तन जागतिक बाजाराला हादरे देत आहेत. ट्रम्प यांचे अमेरिका फर्स्ट हे धोरण जगाला मान्य आहे. पण केवळ अमेरिकेचेच ऐका हा हेका जगासाठी धोकादायक ठरत आहे. अनेक देशांच्या आयात मालावर त्यांनी कर लादला आहे. त्याचे पडसाद बाजारपेठा, व्यावसायिक, व्यापारी जगतात दिसून येत आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी भीतीमुळे सोने आणि चांदीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या(Gold Silver Price Today 12 February 2025 )
सोन्याची 90 हजारी घोडदौड
सोन्याने ट्रम्प धोरणामुळे मोठी मजल मारली आहे. सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले. तर 440 रुपयांनी स्वस्त झाले होते. या सोमवारी सोने 400 रुपयांनी तर मंगळवारी 320 रुपयांनी किंमत वधारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी विक्रमाच्या उंबरठ्यावर
मागील आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. जितका भाव वधारला, तितकेच्या किंमती उतरल्या. त्यानंतर अजून चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण चांदी लवकर विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. चांदीने लाखाच्या उंबरठ्यावर मुक्काम ठोकला आहे. आठवड्यात चांदीतगुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,500 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,481, 23 कॅरेट 85,139, 22 कॅरेट सोने 78,301 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,111 रुपये, 14 कॅरेट सोने 50,006 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 94,170 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.