AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 12 March 2025 : आनंदवार्ता! होळीत महागाईचे दहन, सोने-चांदीत स्वस्ताई, किंमती झाल्या कमी

Gold Silver Rate Today 12 March 2025 : होळीपूर्वीच सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या सणापूर्वीच पेटलेल्या या होळीत महागाईचे दहन झाले. मौल्यवान धातुत इतकी स्वस्ताई आली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 12 March 2025 : आनंदवार्ता! होळीत महागाईचे दहन, सोने-चांदीत स्वस्ताई, किंमती झाल्या कमी
सोने आणि चांदीची किंमतImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 12, 2025 | 8:32 AM
Share

या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या सणापूर्वीच पेटलेल्या या होळीत महागाईचे दहन झाले. काल आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातुच्या किंमतीत वाढ झाली होती. गेल्या आठवड्यात सोने मध्यानंतर स्वस्त झाले होते. तर चांदीने मोठी झेप घेतली होती. मंगळवारी दोन्ही धातुत मोठी घसरण दिसून आली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 12 March 2025 )

सोने झाले स्वस्त

गेल्या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. तर 10 मार्च रोजी सोने 110 रुपयांनी वधारले होते. मंगळवारी सोने 330 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात सुद्धा स्वस्ताईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,035 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीतही आली स्वस्ताई

मागील आठवड्यात चांदीने महागाईची तुतारी फुंकली होती. या आठवड्यातील सुरुवातीच्या दोन दिवसात चांदी किलोमागे 1100 रुपयांनी स्वस्त झाली. सकाळच्या सत्रात सुद्धा घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,024, 23 कॅरेट 85,680, 22 कॅरेट सोने 78,798 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,518 रुपये, 14 कॅरेट सोने 50,324 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,626 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
मोठी बातमी! राज्यातील आणखी 4 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पहा यादी...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या...
लातूरमध्ये फायनान्स कंपनीच्या रिकव्हरी एजंटची मुजोरी! शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटने...
Rajabhau Bhinge : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांना गोळ्या घालून संपवलं, घटनेमागचं नेमकं कारण समोर?
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दीपक केसरकरांनाच विरोध; त्या घोषणाबाजीमुळे वातावरण तापलं!
हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली...
Panvel : हप्त्याचे पैसे ठरले जीवघेणे, आयफोनच्या EMI वरून वाद; मित्रानेच केली मित्राची हत्या
चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi Special Report : चकाट्या पिटणारा गृहमंत्री, उद्धव ठाकरे भडकले नेमकं काय म्हणाले?
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता