EPFO 3.0 Update : बँकेसारखी सेवा, अगदी झटपट, एटीएममधून असा काढा पैसा
EPFO 3.0 Update : केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओ 3.0 विषयी मोठी घोषणा केली. ईपीएफओ लवकरच बँकेसारखी सुविधा देईल, असे मांडवीय म्हणाले. लवकरच सदस्यांना एटीएममधून पैसे काढता येईल.

केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी कर्मचार्यांना केंद्रीय भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) खात्यातून लवकरच पैसे काढता येतील ही घोषणा गेल्या आठवड्यात केली. EPFO 3.0 Update मध्ये अनेक सुविधा सदस्यांना मिळणार आहे. कोणत्याही कर्मचार्याला पैसे काढण्यासाठी आता त्यांची कंपनी, ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. ग्राहक भविष्यात UAN (युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक) माध्यमातून बँक खात्यातून व्यवहार करू शकतील, असे मंत्री म्हणाले.
तेलंगणा येथील ईपीएफओच्या विभागीय कार्यालयाचे उद्धघाटनत त्यांनी केले. त्यावेळी त्यांनी लवकरच सदस्यांना ईपीएफओ 3.0 मध्ये कर्मचार्यांना बँकेसारखी सुविधा मिळेल, असे सांगितले. तर ईपीएफओ एका बँकेसारखे काम करेल, असे ते म्हणाले. नवीन डिजिटल अद्ययावत प्रक्रियेला केंद्र सरकारने EPFO 3.0 असे नाव दिले आहे. एटीएम आणि युपीआय ॲपच्या माध्यमातून लवकरच पीएफ काढता येईल, याविषयी विविध आस्थापनात, कंपनीत काम करणारे कर्मचारी एटीएम कार्ड आणि युपीआय सेवेकडे डोळे लावून बसले आहेत.
UPI आणि ATM Card माध्यमातून काढा रक्कम
ईपीएफओ सदस्यांना लवकरच ATM Card च्या माध्यमातून पीएफ रक्कम काढता येईल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. त्यासाठी ईपीएफओच्या वेबसाईट आणि सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात येत आहे. खातेदारांना लवकरच Paytm, GPay, PhonePe या युपीआय ॲपवरून ही रक्कम काढता येईल. त्यासाठी EPFO ने युपीआय इंटिग्रेशन ही योजना तयार केली आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात ही सुविधा सदस्यांना मिळेल. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईल वॉलेटमधील युपीआय ॲपमध्ये ‘EPFO Withdrawal’ हा पर्याय लवकरच मिळेल. त्याआधारे पीएफ रक्कम काढता येईल.
EPFO Bank अशी करेल काम
ईपीएफओची ही सुधारित प्रणाली बँकिंग सेवेसारखं काम करेल. युनिव्हर्सल अकाऊंट क्रमांक UAN सह ग्राहकांना विविध व्यवहार पूर्ण करता येतील. हे सर्व व्यवहार सहज करता येईल.
झटपट व्यवहार आणि गतीशील प्रक्रिया राबवता येईल. ईपीएफओमधील कामासाठी आता महिना लागणार नाही. या नवीन सुधारणांमुळे झटपट व्यवहार होईल.
गरजेच्या वेळी रक्कम काढण्यासाठीचा दावा, ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा प्रयत्न या गोष्टींना गती मिळेल.
