AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 13 July 2024 : दोनच दिवसात सोन्याची जोरदार उसळी, चांदी नरमली, काय आहेत आता किंमती

Gold Silver Rate Today 13 July 2024 : चांदीने गेल्या काही आठवड्यापासून दरवाढीचा धमाका केला आहे. तर सोन्यात चढउताराचे सत्र होते. आता दोन दिवसांत सोन्याने मोठी मुसंडी मारली. तर चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. काय आहेत आता भाव?

Gold Silver Rate Today 13 July 2024 : दोनच दिवसात सोन्याची जोरदार उसळी, चांदी नरमली, काय आहेत आता किंमती
सोने महागले, चांदी उतरली
| Updated on: Jul 13, 2024 | 8:37 AM
Share

तीन दिवसांच्या उसळीनंतर सोने आणि चांदीत उसळी आली आहे. मौल्यवान धातूंचे भाव वधारले आहेत. सोमवारनंतर दोन्ही धातूंमध्ये घसरणीचे सत्र दिसले. पहिल्या आठवड्यात इतकी या धातूंना घौडदौड करता आली नाही. गेल्या आठवड्यात चांदीने मोठी मुसंडी मारली होती. तर सोन्यात उसळी आली होती. या आठवड्यात चांदी आणि सोने तितके वधारले नाहीत. गेल्या दोन दिवसांत सोन्याने घौडदौड केली तर चांदीत चढउताराचे सत्र आहे. अशा आहेत आता सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 13 July 2024 )

दोन दिवसांत सोने वधारले

महिन्याच्या सुरुवातीला सोने 1500 रुपयांनी वाढले. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 8 जुलै रोजी 220 आणि 9 जुलैला सोने 380 रुपयांनी स्वस्त झाले. 11 जुलैला सोने 220 रुपयांनी वाढले. 12 जुलै रोजी सोने 330 रुपयांनी महागले. आज सकाळी सोन्यात दरवाढीचा अंदाज आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा दरवाढीला ब्रेक

जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांदी 5,000 रुपयांनी महागली. 8 जुलै रोजी चांदी 200 रुपयांनी वधारली तर 9 जुलै रोजी किंमत 500 रुपयांनी उतरली. 11 जुलैला चांदी 1 हजारांनी महागली. 12 जुलै रोजी भाव जैसे थे होते. आज सकाळी चांदीत घसरणीचा अंदाज आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने महागले तर चांदी उतरली. 24 कॅरेट सोने 72,664 रुपये, 23 कॅरेट 72,373 रुपये, 22 कॅरेट सोने 66,560 रुपये झाले. 18 कॅरेट 54,498 रुपये, 14 कॅरेट सोने 42,508 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 91,827 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता