AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीची उडाली घसरगुंडी! ग्राहकांची सराफा बाजारात तुफान गर्दी

Gold Silver Rate Today 18 January 2024 : मध्यंतरी तीन दिवसात उसळी घेतल्यानंतर या आठवड्यात पण सोने-चांदीची घसरगुंडी उडाली आहे. सोने-चांदी घसरल्याने ग्राहकांनी सराफा बाजारात तुफान गर्दी केली आहे. या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मौल्यवान धातूंनी ग्राहकांना आनंदवार्ता आणली आहे.

Gold Silver Rate Today | सोने-चांदीची उडाली घसरगुंडी! ग्राहकांची सराफा बाजारात तुफान गर्दी
| Updated on: Jan 18, 2024 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली | 18 जानेवारी 2024 : सोने-चांदीने खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे. मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरण आली आहे. गेल्या दोन आठवड्यात दोन्ही धातूंनी आनंदवार्ता आणली आहे. 13 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान किंमती वधारल्या. घसणीला ब्रेक लागला. त्यापूर्वी सोने 1300 रुपयांनी आणि चांदी 3100 घसरले होते. या आठवड्यात दोन दिवसात भाव उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. डिसेंबर महिन्यात किंमतींनी उच्चांक गाठला होता. आता असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 18 January 2024)

सोन्याची चमक फिक्की

नवीन वर्षात 3 ते 11 जानेवारीपर्यंत सोन्याचा भाव उतरला. 12 जानेवारी रोजी 100 रुपयांची तर 13 जानेवारी रोजी सोन्यामध्ये 300 रुपयांची वाढ झाली. तर या आठवड्यात 15 जानेवारीला सोन्याच्या किंमती 150 रुपयांनीवाढल्या. 16 जानेवारीला 100 रुपयांनी भाव उतरले. तर 17 जानेवारी रोजी 350 रुपयांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची स्वस्ताई

या वर्षाच्या सुरुवातीला चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. 10 जानेवारीला चांदी 600 रुपयांनी महागली. 11-12 जानेवारी रोजी भाव स्थिर होते. 13 जानेवारीला 500 रुपयांची दरवाढ झाली. या आठवड्यात 15 जानेवारीला 300 रुपयांची वाढ झाली. तर 16 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीचे भाव उतरले. 24 कॅरेट सोने 62,277 रुपये, 23 कॅरेट 62,028 रुपये, 22 कॅरेट सोने 57,046 रुपये झाले. 18 कॅरेट 46,708 रुपये, 14 कॅरेट सोने 36,432 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,191 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच