AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : ग्राहकांना सुखद धक्का, सोने-चांदीत स्वस्ताई, इतका घसरला भाव

Gold Silver Rate Today 17 January 2024 : या वर्षाच्या सुरुवातीपासून सोने-चांदीत पडझडीचे सत्र सुरु होते. पण त्याला ब्रेक लागला. गेल्या शुक्रवारपासून मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढ झाली. सोमवारी पण बाजारात दरवाढ झाली होती. आता सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. इतक्या कमी झाल्या किंमती

Gold Silver Rate Today : ग्राहकांना सुखद धक्का, सोने-चांदीत स्वस्ताई, इतका घसरला भाव
| Updated on: Jan 17, 2024 | 8:32 AM
Share

नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : सोने-चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. मौल्यवान धातूने घसरणीला ब्रेकल लावत दरवाढीचे सत्र आरंभले होते. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पण मौल्यवान धातूंनी उसळी घेतली होती. त्यानंतर अचानक दरवाढीला ब्रेक लागला. सोने-चांदीत घसरण आली. खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला. यापूर्वी 3 ते 11 जानेवारीपर्यंत सोन्यात घसरण झाली. या काळात सोने 1300 रुपयांनी आणि चांदी 3100 रुपयांनी स्वस्त झाली. डिसेंबर महिन्यात मात्र मौल्यावान धातूंनी सर्वकालीन उच्चांकी कामगिरी केली. किंमती कमी झाल्याने आता ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. काय आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 17 January 2024)

सोने झाले स्वस्त

नवीन वर्षात सोन्यात घसरणीचे सत्र होते. 3 ते 11 जानेवारीपर्यंत सोन्याचा भाव घसरला. 12 जानेवारी रोजी 100 रुपयांची तर 13 जानेवारी रोजी सोन्यामध्ये 300 रुपयांची वाढ झाली. 15 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 150 रुपयांनी वधारला. तर 16 जानेवारी रोजी 100 रुपयांनी भाव उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची किंमत घसरली

चांदीने या वर्षाच्या सुरुवातीला ग्राहकांना दिलासा दिला. 10 जानेवारी रोजी 600 रुपयांनी भाव उतरले. 11-12 जानेवारी रोजी किंमती बदल झाला नाही. 13 जानेवारी रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. 15 जानेवारीला 300 रुपयांची वाढ झाली. तर 16 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी महागले . 24 कॅरेट सोने 62,608 रुपये, 23 कॅरेट 62,357 रुपये, 22 कॅरेट सोने 57349 रुपये झाले. 18 कॅरेट 46,956 रुपये, 14 कॅरेट सोने 36,626 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,666 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

Follow Us
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट...
दिल्लीत घडामोडी वाढल्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट संपली, बैठकीत...
अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
रात्रभर झोप नव्हती... अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया