AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने धरली महागाईची वाट, असा वधारला भाव

Gold Silver Rate Today : घसरणीला सोने-चांदीने ब्रेक लावला. गेल्या आठवड्याच्या शेवटी सोने-चांदीच्या किंमती वाढल्या होत्या. या आठवड्याची सुरुवात पण दरवाढीने झाली. त्यापूर्वी सोने 1300 रुपयांनी तर चांदी 3100 रुपयांनी स्वस्त झाली होती. त्यात दरवाढीची चुणूक दिसून आली. किंमती अशा अपडेट झाल्या आहेत.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने धरली महागाईची वाट, असा वधारला भाव
| Updated on: Jan 16, 2024 | 8:32 AM
Share

नवी दिल्ली | 16 जानेवारी 2024 : सोने-चांदीने या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीची सलामी दिली. या वर्षाच्या सुरुवातीला सोने-चांदीत पडझड झाली. सलग दहा दिवस किंमतीत घसरण सुरु होती. सोने 1300 रुपयांनी आणि चांदी 3100 रुपयांनी स्वस्त झाली होती. डिसेंबर महिन्यात सोने-चांदीने उच्चांकी दर गाठला होता. त्यानंतर ही घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडली. खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. गेल्या आठवड्याच्या शेवटी दरवाढ झाली. तर सोमवारी पण भाव वधारले. अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती… (Gold Silver Price Today 16 January 2024)

सोन्यात दरवाढ

सोन्याने नवीन वर्षात ग्राहकांना दिलासा दिला. 3 ते 11 जानेवारीपर्यंत सोन्यात घसरण झाली. 12 जानेवारी रोजी 100 रुपयांची तर 13 जानेवारी रोजी सोन्यामध्ये 300 रुपयांची वाढ झाली. 15 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 150 रुपयांनी वधारला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी चमकली

या वर्षाच्या सुरुवातीला घसरणीमुळे ग्राहकांची चांदी झाली. 10 जानेवारी रोजी किंमतीत 600 रुपयांची घसरण झाली. 11-12 जानेवारी रोजी किंमती स्थिर होत्या. 13 जानेवारी रोजी 500 रुपयांनी किंमती वधारल्या. 15 जानेवारी रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,800 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी महागले . 24 कॅरेट सोने 62,707 रुपये, 23 कॅरेट 62,456 रुपये, 22 कॅरेट सोने 57439 रुपये झाले. 18 कॅरेट 47,030 रुपये, 14 कॅरेट सोने 36,683 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,140 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच