सोन्याने दिली ग्राहकांना आनंदवार्ता, चांदी मात्र इतकी महागली, काय आहेत किंमती

| Updated on: Mar 24, 2024 | 8:37 AM

Gold Silver Rate Today 24 March 2024 | गेल्या दोन आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. पण गुरुवारी 21 मार्च रोजी सोने आणि चांदीने अचानक मोठी उसळी घेतली. या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले तर चांदीने या आठवड्यात 2800 रुपयांची भरारी घेतली. काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती...

सोन्याने दिली ग्राहकांना आनंदवार्ता, चांदी मात्र इतकी महागली, काय आहेत किंमती
सोन्याची आनंदवार्ता, चांदीसाठी मोजा जादा दाम
Image Credit source: गुगल
Follow us on

सोने आणि चांदीच्या दरवाढीला मार्च महिना पावला. जानेवारी आणि फेब्रुवारीत दोन्ही धातूंना विक्रम करता आला नाही. मार्च महिन्यात सुरुवातीच्या दहा दिवसांत मौल्यवान धातूंनी चौकर आणि षटकार लगावले. मार्चच्या सुरुवातीला सोन्याने 3,430 रुपयांची आघाडी घेतली. तर महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत चांदी 3 हजारांनी उसळली. त्यानंतर दोन आठवड्यांत मोठी दरवाढ दिसली नाही. दोन्ही धातूच्या किंमतीत चढउताराचे सत्र होते. पण गुरुवारी 21 मार्च रोजी सोने आणि चांदीने टॉप गिअर टाकला. या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले तर चांदीने या आठवड्यात 2800 रुपयांची भरारी घेतली. सोने आणि चांदीचा (Gold Silver Price Today 24 March 2024) आता काय आहे भाव?

  • सोने 1500 रुपयांनी उसळले – मागील दोन आठवड्यात सोन्याला मोठी झेप घेता आली नव्हती. या आठवड्यात, 18 मार्च रोजी सोने 210 रुपयांनी स्वस्त झाले. 19 मार्च रोजी सोने 460 रुपयांनी महागले. गुरुवारी, 21 मार्च रोजी 1,000 रुपयांची भरारी घेतली. 22 मार्च रोजी किंमती 450 रुपयांनी उतरल्या. तर 23 मार्च रोजी किंमती 110 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 61,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  • चांदी वधारली – गेल्या आठवड्यात चांदी 2600 रुपयांनी महागली तर 900 रुपयांनी स्वस्त झाली. या आठवड्यात 18 मार्च रोजी 300 रुपयांनी भाव उतरला. 19 मार्च रोजी तितकीच वाढ झाली. 20 मार्च रोजी 300 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 21 मार्च रोजी चांदी 1500 रुपयांनी वधारली. 22 मार्च रोजी चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली. 23 मार्च रोजी चांदीत हजार रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 66,268 रुपये, 23 कॅरेट 66,003 रुपये, 22 कॅरेट सोने 60,702 रुपये झाले.18 कॅरेट 49,701 रुपये, 14 कॅरेट सोने 38,767 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,052 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हे सुद्धा वाचा

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.