AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 27 September 2024 : थांबायचं नाय गड्या आता थांबायच नाय, सोने आणि चांदी सुसाट; प्रत्येक दिवशी नव्या विक्रमाला गवसणी, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 27 September 2024 : सोने आणि चांदीत दरवाढीचे तुफान आले आहे. दोन्ही धातूंनी सणासुदीच्या काळात मोठा टप्पा गाठला आहे. वायदे बाजारात दोन्ही धातूंनी विक्रमाला गवसणी घातली आहे. तर सराफा बाजारात मौल्यवान धातू लवकरच कमाल दाखवण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate Today 27 September 2024 : थांबायचं नाय गड्या आता थांबायच नाय, सोने आणि चांदी सुसाट; प्रत्येक दिवशी नव्या विक्रमाला गवसणी, काय आहेत किंमती?
सोने-चांदी थांबता थांबेनात
| Updated on: Sep 27, 2024 | 8:37 AM
Share

पितृपक्ष संपण्यास आता काहीसा कालावधी उरला आहे. पण या काळात सोने आणि चांदीने नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. दोन्ही धातूत दरवाढीचे तुफान आले आहे. सणासुदीच्या काळात दोन्ही धातूंनी दरवाढीचा नवीन टप्पा गाठला आहे. वायदे बाजारात दोन्ही धातूंनी विक्रमाला गवसणी घातली आहे. तर सराफा बाजारात मौल्यावान धातू लवकरच कमाल दाखवण्याची शक्यता आहे. पितृपक्ष संपताच ग्राहकांचा खिसा मोठ्या प्रमाणात कापल्या जाणार आहे. ग्राहकांना या दरवाढीचा ताप सोसावा लागणार आहे. आता काय आहेत सोने आणि चांदीची किंमत? (Gold Silver Price Today 27 September 2024 )

सोने सुटले सुसाट

गेल्या दहा दिवसांत सोन्याने 1800 रुपयांहून अधिकची भरारी घेतली. त्यापूर्वी पण दरवाढीचा हा आलेख उंचावतच होता. 23 सप्टेंबर रोजी सोने 220 रुपयांनी तर मंगळवारी 210 रुपयांनी किंमती वधारल्या. 25 सप्टेंबर रोजी दर 660 रुपयांनी वाढले. काल भावात बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची दमदार कामगिरी

गेल्या दहा दिवसांत चांदीत जवळपास 5 हजार रुपयांची उसळी आली. गेल्या आठवड्यात चांदी 2500 रुपयांनी महागली होती. 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी किंमती स्थिर होत्या. तर 25 सप्टेंबर रोजी चांदीने दोन हजारांची मुसंडी मारली. त्यानंतर पुन्हा भाव स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,750, 23 कॅरेट 74,447, 22 कॅरेट सोने 69,387 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,812 रुपये, 14 कॅरेट सोने 44,314 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,522 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?

पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी