AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 4 August 2024 : ग्राहकांच्या पोटात माईना आनंद, सोने आणि चांदीत मोठी घसरण, आता किंमत किती?

Gold Silver Rate Today 4 August 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीने दरवाढीचा बार उडवला होता. पण आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातूत पडझड झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरण झाली. आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 4 August 2024 : ग्राहकांच्या पोटात माईना आनंद, सोने आणि चांदीत मोठी घसरण, आता किंमत किती?
सोने आणि चांदी भाव
| Updated on: Aug 04, 2024 | 8:32 AM
Share

श्रावण सुरु होण्यापूर्वीच ग्राहकांच्या चेहऱ्यावर गोड हसू फुलले. सोने आणि चांदीच्या किंमतीत एकदम घसरण झाली. आठवड्याच्या शेवटी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदवार्ता आली. या आठवड्यात मौल्यवान धातूंनी दरवाढीचा धडाका लावला. विक्रमी घसरणीनंतर या आठवड्यात विक्रमी दरवाढ नोंदवली गेली. या आठवड्यात सोन्याने दोन हजारांची भरारी घेतली तर चांदीत 3200 रुपयांची दरवाढ झाली. आठवड्याच्या अखेरीस बेशकिंमतीत धातूत घसरण आली. काय आहेत आता किंमती? (Gold Silver Price Today 4 August 2024 )

दरवाढीनंतर घसरण

या आठवड्यात सोन्याच्या किंमती वधारल्या. सोन्यात या आठवड्यात 1900 रुपयांची वाढ झाली. 29 जुलैला सोने 270 रुपयांनी वधारले. मंगळवारी किंमती 210 रुपयांनी उतरल्या. 31 जुलै रोजी सोने 870 रुपयांनी महागले. 1 ऑगस्ट रोजी त्यात 540 रुपयांची वाढ झाली. 2 ऑगस्ट 330 रुपयांनी किंमती वधारल्या. तर 3 ऑगस्टला सोने 110 रुपयांनी कमी झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत आता पडझड

या आठवड्यात चांदी 3200 रुपयांनी महागली. 29 जुलैला चांदी 500 रुपयांनी वधारली. मंगळवारी तितकीच घसरण झाली. 31 जुलै रोजी चांदीने 2 हजारांची मुसंडी मारली. 1 ऑगस्टला भाव 600 रुपये तर 2 ऑगस्टला 100 रुपयांनी वधारले. तर 3 ऑगस्ट रोजी किंमत 1700 रुपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70,392, 23 कॅरेट 70,110, 22 कॅरेट सोने 64,479 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,794रुपये, 14 कॅरेट सोने 41,179 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 83,501 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना