AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 5 September 2024 : गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता सोने आणि चांदीत मोठी घसरण, आता काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 5 September 2024 : बाप्पाचं आगमन होत असल्याने बाजारपेठा सजल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी बेशकिंमती धातूच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांचा उत्साह शिगेला आहेत. आता असा आहे भाव?

Gold Silver Rate Today 5 September 2024 : गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता सोने आणि चांदीत मोठी घसरण, आता काय आहेत किंमती?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Sep 05, 2024 | 8:34 AM
Share

ग्राहकांना मौल्यवान धातूने मोठा दिलासा दिला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भावात थोडा बदल झाला. पण नंतर किंमतीत मोठी उसळी घेण्यात दोन्ही धातूंना दम लागला. त्यामुळे दाम आटोक्यात राहिले. आता बाप्पाचे आगमन होत असल्याने बाजारपेठेत चैतन्य आहे. गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. मौल्यवान धातूच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून नरमाई आली आहे. आता काय आहे सोने आणि चांदीचा भाव? (Gold Silver Price Today 5 September 2024 )

सोन्यात घसरणीचे सत्र

28 ऑगस्ट रोजी सोने वधारले होते. 220 रुपयांनी सोन्याची किंमत वधारली होती. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याला भरारी घेता आलेली नाही. या दरम्यान 30, 31 ऑगस्ट, 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी किंमतीत घसरण झाली. 1 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. 2 सप्टेंबर रोजी किंमती 270 रुपयांनी उतरल्या. तर 5 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,830 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची चमक फिक्की

27 ऑगस्ट रोजी 600 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर चांदीची चमक फिक्की पडली. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी मिळून चांदी 1500 रुपयांनी उतरली. सोमवारी भाव स्थिर होता. 2 आणि 4 सप्टेंबर रोजी चांदीत एकूण 2 हजारांची घसरण झाली. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,295, 23 कॅरेट 71,010, 22 कॅरेट सोने 65,306 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,471 रुपये, 14 कॅरेट सोने 41,708 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 81,337 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता