इंटरनेटच्या देवाला ललनेचा फास; युलिया वाव्हिलोवा खरंच आहे का विषकन्या? टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांच्या अटकेची इनसाईड स्टोरी वाचली का?
Yulia Vailova - Pavel Durov : सध्या जगातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संकट ओढावले आहे. फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सॲपच नाही तर आता टेलिग्रामवर सरकारी निर्बंधांचा फास आवळत आहे. प्रत्येक देशाच्या कायद्याचा बडगा या समाज माध्यमांवर उगरण्यात येत आहे. सर्वात पहिला बळी टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांचा गेला आहे.

तर त्याला जणू कोणतीच बंधने नको आहेत. तो मुळातच व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. पण त्याच्या या भूमिकेचा दहशतवादी, लहान मुलांचे शोषण करणारे, वाईट कामांसाठी निधी जमा करणाऱ्यांनी फायदा उठवला. त्याचे टेलिग्राम हे जगात लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सोशल मीडियाच्या जगात युझर्सच्या संख्येनुसार ते सहाव्या क्रमांकावर आहे. रशियातील या तरुणाने इंटरनेटचा देव होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि सत्यात उतरवले. मॅसेजिंगच्या विश्वात मोठा चमत्कार केला. जगभरातील विद्यार्थ्यांचा गळ्यातील ताईत असलेले टेलिग्राम प्रत्यक्षात आणले. पॉवेल डुरोव नाम तो सुनाही होगा. जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तहेर संघटना मोसाद त्याच्या मागावर आहे. इतर देशांचा पण त्याच्यावर दबाव आहे. फ्रान्स सरकारने त्याला...
