AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 9 August 2024 : ग्राहकांना श्रावण पावला, सोने-चांदीत मोठी घसरण, अशी आली स्वस्ताई

Gold Silver Rate Today 9 August 2024 : बजेट 2024 मध्ये सोने आणि चांदीच्या सीमा शुल्कात संदर्भात क्रांतीकारी निर्णय झाला. त्यानंतर मौल्यवान धातूत मोठी पडझड झाली. या क्रांती दिनी काय आहेत या दोन्ही धातूंचे भाव?

Gold Silver Rate Today 9 August 2024 : ग्राहकांना श्रावण पावला, सोने-चांदीत मोठी घसरण, अशी आली स्वस्ताई
सोने-चांदीचा भाव
| Updated on: Aug 09, 2024 | 8:39 AM
Share

आज 9 ऑगस्ट, क्रांती दिन, या बजेट 2024 मध्ये केंद्र सरकारने सोने आणि चांदीसंदर्भात एक क्रांतीकारी निर्णय घेतला. सीमा शुल्क कपातीचा निर्णय घेतल्याने मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली. ग्राहकांची सराफा बाजारात पुन्हा वर्दळ वाढली. गेल्या आठवड्यात किंमती वधारल्या होत्या. तर या आठवड्यात आतापर्यंत दोन्ही धातूच्या किंमती उतरल्या आहेत. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता काय आहेत भाव? (Gold Silver Price Today 9 August 2024 )

सोने 1300 रुपयांनी उतरले

या आठवड्यात सोन्याचा भाव उतरला. किंमती कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आतापर्यंत 1300 रुपयांनी सोने स्वस्त झाले आहे. सोमवारी सोने किंचित उतरले. 6 ऑगस्टला त्यात 870 रुपयांची घसरण झाली. 7 ऑगस्ट रोजी किंमती 440 रुपयांनी उतरल्या. काल कोणताही बदल दिसला नाही. आज सकाळच्या सत्रात दर घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 63,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 4200 रुपयांनी स्वस्त

गेल्या आठवड्यात चांदीने 3200 रुपयांची भरारी घेतली होती. तर या आठवड्यात चांदी 4200 रुपयांनी स्वस्त झाली. 5 ऑगस्टाला चांदी 200 रुपयांनी वधारली. तर 6 ऑगस्टला किंमती 3200 रुपयांनी कमी झाल्या. त्यात सलग दोन दिवस 500 रुपयांची घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात पण किंमतीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 81,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,205, 23 कॅरेट 68,928, 22 कॅरेट सोने 63,392 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,904 रुपये, 14 कॅरेट सोने 40,485 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 78,880 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.