AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Investment : वर्षभरात मालामाल, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचं नशीब पालटलं, भाव तब्बल…

Gold And Silver Rate :  गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि बदलत्या घडामोडी याचा सोने-चांदीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. तात्पुरत्या काळासाठी सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळाले. पण दीर्घकाळाचा विचार केल्यास सोन्याने गुंतवणूकदरांना दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात सोन्याचा भाव तब्बल 52 टक्क्यांनी […]

Gold Investment : वर्षभरात मालामाल, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचं नशीब पालटलं, भाव तब्बल...
gold and silver rate today
| Updated on: Sep 28, 2025 | 6:49 PM
Share

Gold And Silver Rate :  गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि बदलत्या घडामोडी याचा सोने-चांदीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. तात्पुरत्या काळासाठी सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळाले. पण दीर्घकाळाचा विचार केल्यास सोन्याने गुंतवणूकदरांना दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात सोन्याचा भाव तब्बल 52 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी सोन्यात गुंतवणूक करणारे चांगलेच मालामाल झाले आहेत. आगामी काळातही सोन्याचा भाव असाच वाढण्याची शक्यता वर्षाअखेर तो दीड लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चांदीचा भाव नेमका किती वाढला?

तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या भाववाढीची सध्याची स्थिती लक्षात घेता सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंची किंमत चांगलीच वाढू शकते. सोन्याचा भाव वर्षाअखेरपर्यंत तब्बल दीड लाखांपर्यंत तर चांदीचा भाव तब्बल पावने दोन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एका वर्षाच्या कालावधीच तुलना करायची झाल्यास तुम्हाला सोन्याने किती रिटर्न्स दिलेले आहेत, हे लक्षात येईल. वर्षभराच्या काळात सोन्याच्या भावात 39040 रुपये म्हणजेच तब्बल 52.57 टक्क्यांनी वाढ झालेली असून सोन्याचा भाव आता 114,370 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. बरोबर एका वर्षापूर्वी हाच सोन्याचा भाव 75,330 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीचा भाव तब्बल 55.51 टक्क्यांनी वाढला

चांदीबाबतही अशीच स्थिती आहे. चांदीच्या दरात एका वर्षात साधारण 50750 रुपयांनी म्हणजेच 55.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या चांदीचा भाव 142,180 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. एका वर्षाआधी चांदीचा भाव 91,430 रुपये प्रति किलो होता. सध्या 22 कॅरेट सोन्याची किंमत 105,353 लाख रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 114,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव 142,180 प्रति किलोवर आहे.

देशातील प्रमुख शहरांत सोने-चांदीचा भाव किती?

राजधानी दिल्लीमध्ये 22 आणि 24 सोन्याचा भाव अनुक्रमे 104,986 रुपये आणि 114,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 141,670 रुपये प्रति किलो आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 105,169 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 114,730 रुपये प्रति दहा ग्रॅम चालू आहे. तर मुंबई चांदीचा भाव 141,920 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. कोलकाता शहरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 105,023 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 114,570 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीचा भाव 141,730 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात