8th Pay Commission: दिवाळीपूर्वी गुडन्यूज! 8 व्या वेतन आयोगाच्या साईटवर मोठी अपडेट, काय नवीन संदेश?

8th Pay Commission Update: दिवाळीपूर्वी 8 व्या वेतन आयोगाच्या साईटवर मोठी अपडेट समोर आली आहे. त्यावर नवीन संदेश देण्यात आला आहे. वेतन आयोगाच्या ताज्या माहितीविषयी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.

8th Pay Commission: दिवाळीपूर्वी गुडन्यूज! 8 व्या वेतन आयोगाच्या साईटवर मोठी अपडेट, काय नवीन संदेश?
दिवाळीपूर्वी गुडन्यूज! 8 व्या वेतन आयोगाच्या साईटवर मोठी अपडेट, काय नवीन संदेश?
| Updated on: Nov 07, 2026 | 9:19 AM

8th Pay Commission Update: दिवाळीपूर्वी 8 व्या वेतन आयोगाच्या साईटवर मोठी अपडेट समोर आली आहे. वेतन आयोगाच्या ताज्या माहितीविषयी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. कारण नवीन वेतन वाढ, महागाई भत्त्यातील वाढ, पेन्शनमधील बदल, इतर नियमातील बदल याविषयीची माहिती त्यांना जाणून घ्यायची असते. आयोगाचे सदस्य देशातील विविध शहरात जाऊन तिथल्या कर्मचारी संघटना, प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत आहेत. आयोगाचे पथक काही दिवसांपूर्वी मुंबईत येऊन गेले आहे. आता आयोगाच्या साईटवर मोठी अपडेट समोर आली आहे. त्यावर नवीन संदेश देण्यात आला आहे.

पीएम मोदी करणार मोठी घोषणा?

Loading...

8 व्या वेतन आयोगाच्या अधिकृत साईट 8cpc.gov.in वर एक अपडेट संदेश फ्लॅश झाला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, वा पेन्शन, फिटमेंट फॅक्टर, पेन्शनचे पुनरावलोकन याविषयीचा हा संदेश नाही. मन की बात चा 140 वा भाग लवकरच प्रसारित होणार आहे. त्याची माहिती या संदेशातून देण्यात आली आहे. सरकारच्या कार्यक्रमाचा प्रचार या संकेतस्थळावरून करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम नियमित प्रसारित होतो. 29 नोव्हेंबर रोजी हा पंतप्रधान देशातील नागरिकांशी संवाद साधतील.

3 नोव्हेंबर 2025 रोजी 8 व्या वेतन आयोगाची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. आज 7 नोव्हेंबर रोजी या वेतन आयोगाच्या स्थापनेला 369 दिवस म्हणजे 1 वर्षे होऊन गेले आहेत. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग स्थापन करण्यात आला आहे. नियमानुसार, 18 महिन्याचा कालावधी पूर्ण होण्यास अजून 6 महिने उरलेले आहेत. 3 मे 2027 रोजीपर्यंत वेतन आयोगाच्या शिफारशी सादर होणार आहेत. दरम्यान मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान या नवीन वेतन आयोगासंबंधी काही सांगितला का? याची ही चर्चा सुरू झाली आहे.

सूचना, हरकती पाठवा

29 नोव्हेंबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बातचा कार्यक्रम होणार आहे. मन की बातचा 140 वा भाग प्रसारित होईल. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे सामाजिक मुद्दे, राष्ट्रीय महत्त्वाचे विषय आणि इतर अनेक मुद्यांवर चर्चा करतात. या कार्यक्रमासाठी नागरिकांना त्यांच्या सूचना आणि तक्रारी पाठवता येतात.

जर केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांना 8 व्या वेतन आयोगासंदर्भात काही सूचना असतील, हरकती असतील तर ते सुचवू शकतात. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-11-7800 वर कॉल करून हिंदी वा इंग्रीजत त्यांचा संदेश रेकॉर्ड करून पाठवू शकता. अथवा 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन SMS लिंकच्या माध्यमातून त्यांच्या सूचना पाठवू शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us