AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तोच इशारा हवामान विभागाकडून, IMD चा अलर्ट, थेट राज्यात..

भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस उष्णता अधिक वाढताना दिसेल. हेच नाही तर बंगालच्या खाडीत एल निनोमुळे तापमान वाढत आहे. ज्यामुळे येणाऱ्या दिवसात उष्णता अधिक वाढेल.

ज्याची भीती तोच इशारा हवामान विभागाकडून, IMD चा अलर्ट, थेट राज्यात..
Weather Update
| Updated on: Nov 07, 2026 | 9:10 AM
Share

राज्यातील हवामानात बदल होत आहे. मध्यंतरी अनेक भागात पाऊस झाला. राज्यात यंदा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला. नुकताच झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला. मात्र, आता पुन्हा राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाल्यानंतर आता थंडीची चाहूल लागत आहे. त्यातच मोठा इशारा देण्यात आला. स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात अल निनो अधिक तीव्र झाला आहे. ज्यामुळे पश्चिम बंगालच्या खाडीत समुद्रातील तापमानात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली. नॉर्थ इस्ट मॉन्सून अॅक्टिव्ह झाला. आज जवळपास ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार असून दुष्काळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

आज कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात 37 अंशापर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7 नोव्हेंबर रोजी जवळपास जिल्ह्यात हवामान कोरडे राहिल. राज्यात पुढील काही दिवसात उष्णता अधिक वाढण्याचे दाट संकेत आहेत.

त्यातच उष्णतेसोबतच मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत, तरी देखील दिवाळीत मात्र या निर्बंधांना नागरिकांकडून हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. गेली काही वर्षे मुंबईतील हवा गुणवत्तेत्चा विषय चिंतेचा बनला आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता स्थर खालवला असून प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईच्या कालच्या AQI 107 तर आजचा AQI 102 नोंदवला आहे.

यामध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सर्वात प्रदूषित हवा आहे. त्यातच राज्यातील इतर भागात उष्णता वाढली आहे. मुंबईतील हवा दिवसेंदिवस घातक बनत चालली आहे. सकाळी सर्वत्र धुके बघायला मिळाले. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्याकरिता पुढील काही दिवस अत्यंत धोकादायक आहेत. पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. मराठवाड्यासह अनेक भागात स्थिती अधिक भीषण आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने थोड्याप्रमाणा दिलासा मिळाला.

Follow Us
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा
सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या....
Gokul Milk Union : सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या संस्थांवर...
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल