IND A vs NZ A : शतकावर शतक.. यशस्वी जैस्वालच्या बॅटिंगची कमाल, एकदम सुसाट, न्यूझीलंडला आणलं टेन्शनमध्ये, रोक सको तो रोक लो
IND A vs NZ A : न्यूझीलंड विरुद्ध यशस्वी जैस्वाल सॉलिड बॅटिंग करतोय. त्याला रोखणं न्यूझीलंडच्या गोलंदाजांना जवळपास अशक्य दिसतय. यशस्वी जैस्वाल न्यूझीलंडच्या मैदानात धावांचा पाऊस पडतोय.

Yashasvi Jaiswal Century : न्यूझीलंड दौऱ्यात यशस्वी जैस्वालला सूर गवसला आहे. तो टीम इंडियाच्या टी20 किंवा वनडे टीमचा भाग नाहीय. पण कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. टी20 सीरीज संपली असून सध्या वनडे सीरीज सुरु आहे. अजून कसोटी मालिकेला सुरुवात झालेली नाही. पण यशस्वीने ‘न्यूझीलंड ए’ विरुद्ध सलग दुसरं शतक ठोकलं आहे. लिंकन येथे सुरु असलेल्या तिसऱ्या अनऑफिशियल टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये यशस्वीने ही शतकी खेळी केली. याआधी यशस्वी जैस्वालने क्राइस्टचर्चच्या दुसऱ्या अनऑफिशियल टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 155 धावा ठोकून फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या बळावर इंडिया ए ला तिसऱ्या चार दिवसीय मॅचमध्ये चांगली सुरुवात मिळाली आहे.
यशस्वी जैस्वालने न्यूझीलंड ए विरुद्ध तिसऱ्या अनऑफिशियल टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 138 चेंडूत 102 धावा केल्या. यात 16 चौकार आणि दोन षटकार होते. यशस्वीने 127 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. न्यूझीलंड ए विरुद्ध यशस्वी जैस्वालचं हे सलग दुसरं शतक आहे. फर्स्ट क्लास करियरमधील 19 वं शतक आहे.
दोन इनिंगमध्ये आतापर्यंत 257 धावा
यशस्वी जैस्वालने न्यूझीलंड ए विरुद्ध तीन टेस्ट मॅचच्या पाच इनिंगमध्ये आतापर्यंत 278 धावा केल्या आहेत. यात 257 धावा त्याने शेवटच्या दोन इनिंगमध्ये केल्या आहेत. म्हणजे पहिल्या तीन इनिंगमध्ये त्याने फक्त 21 धावा केल्या होत्या.
ओपनिंग विकेटसाठी दमदार पार्टनरशिप
यशस्वीने त्याच्या शतकी खेळीत पहिल्या विकेटसाठी साई सुदर्शनसोबत शानदार भागीदारी केली. दोघांनी 258 चेंडूत 175 धावा फटकावल्या. यात यशस्वी जैस्वालच्या 102 रन्स आहेत. साई सुदर्शनने 58 धावा केल्या.
यशस्वीने न्यूझीलंडचं वाढवलं टेन्शन
यशस्वी जैस्वालचं फॉर्ममध्ये परतणं, शतक ठोकणं ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. न्यूझीलंडसाठी टेस्ट सीरीज आधी टेन्शन वाढवणारी बाब आहे. यशस्व जैस्वाल मॅच विनर प्लेयर आहे. तो खेळपट्टीवर असताना स्कोर बोर्डवर वेगाने धावा बनतात. त्याचा हाच फॉर्म कायम राहिला तर ही न्यूझीलंडसाठी धोक्याची घंटा ठरले.
