Gold Rate | गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे दर पुन्हा घसरले

| Updated on: Jan 08, 2021 | 12:46 AM

सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली.

Gold Rate | गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे दर पुन्हा घसरले
एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मतानुसार बजेटनंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होऊ शकते. सध्या सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त असल्यामुळे आणि त्यात पुन्हा जीएसटी लागत असल्यानं सोन्याचे वाढलेत.
Follow us on

नवी दिल्ली : सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली. सोने 714 रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे प्रतितोळा सोन्याचे दर 50 हजार 335 रुपये इतका झाला. दुसरीकडे चांदीच्या दरातही 386 रुपयांची घट झाली. त्यामुळे चांदीचे दर प्रतिकिलो 69 हजार 708 रुपयांवर आले. मागील वर्षी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 30 टक्क्यांचा नफा मिळाला होता. यावर्षी सोन्याचा दर 60 हजार रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात सोने गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरत आहे (Good News for investor in Gold rate decreases again January 7 2021).

सोन्याचे दरात घट का?

एचडीएफसी सिक्‍युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला. दिल्लीतील बाजारातही सोन्याचे दर कमी झाले आणि घसरलेल्या दरासह बाजार बंद झाला. दुसरीकडे चांदीच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिर असूनही भारतीय बाजारात चांदीचा भाव घसरल्याचं पाहायला मिळालं.

सोने खरेदी करताना स्वतःची ओळखपत्र दाखवावं लागणार

अर्थ मंत्रालयाने घेतलेल्या एका निर्णयानुसार आता रोख पैसे देऊन सोने, चांदी, डायमंड, प्लॅटिनम किंवा इतर धातू खरेदी करताना ग्राहकांना आपलं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. म्हणजेच ग्राहकांना आधार कार्ड आणि पॅन कार्डशिवाय खरेदी करता येणार नाही. अर्थ मंत्रालयाने 28 डिसेंबरला सोने व्यवहाराला PMLA च्या अंतर्गत आणले. आता कागदपत्रांशिवाय होणाऱ्या सोन्याच्या व्यवहारांचा तपास करण्याचे अधिकार ईडीला देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

Gold Price Today : 714 रुपयांनी सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली; वाचा आजचे नवे दर

तुम्ही सोने खरेदी आणि विक्री करता? तर जाणून घ्या कसा आणि किती लागतो टॅक्स…

सोनं किती टक्के शुद्ध? ‘या’ अ‍ॅपवर कळणार माहिती, तक्रार करण्याचीदेखील व्यवस्था

Good News for investor in Gold rate decreases again January 7 2021