AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : 714 रुपयांनी सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली; वाचा आजचे नवे दर

नवी दिल्ली : कोरोनाच्या या जीवघेण्या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) सतत चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजार रुपयांच्या वर पोहोचली आहे. दिल्ली सराफा बाजारात 7 जानेवारी 2021 ला सोन्याच्या किंमती (सोन्याच्या किंमती आज) 10 […]

Gold Price Today : 714 रुपयांनी सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली; वाचा आजचे नवे दर
| Edited By: | Updated on: Jan 07, 2021 | 5:12 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या या जीवघेण्या काळात सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) सतत चढ-उतार झाल्याचं पाहायला मिळालं. अशात आता भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजार रुपयांच्या वर पोहोचली आहे. दिल्ली सराफा बाजारात 7 जानेवारी 2021 ला सोन्याच्या किंमती (सोन्याच्या किंमती आज) 10 ग्रॅम सोनं 714 रुपयांनी कमी घसरलं आहे. (gold silver price today update thursday gold silver fell check new rates )

इतंकच नाही तर चांदीच्या दरातही आज 386 रुपयांची घट झाली. गेल्या व्यापार सत्रामध्ये दिल्ली बुलियन मार्केटमध्ये 10 ग्रॅम सोन्याचे दर 51,049 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो 70,094 रुपये होता. अशात आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं समोर आलं आहे, तर चांदीची किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

नवीन सोन्याचे दर (Gold Price, 7 January 2021)

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 714 रुपयांची घट झाली. राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत आता 50,335 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. याआधीही व्यापार सत्रात 10 ग्रॅम सोन्याचा दर 51,049 रुपयांवर बंद झाला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज प्रति औंस 1,916 पर्यंत पोहोचली आहे.

चांदीचा आजचा भाव (Silver Price, 7 January 2021)

गुरुवारी चांदीच्या भावातही घट झाल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज चांदीच्या किंमतीत 386 रुपयांनी घट झाली. आता त्याची किंमत 70 रुपयांवरून घसरत 69,708 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीची किंमत प्रति औंस 27.07 डॉलरवर बंद झाली.

का घसरले सोन्याचे भाव?

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या (HDFC Securities) म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीतील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला. यामुळे दिल्ली सराफा बाजारातही सोन्याचे भाव घसरले. त्याचबरोबर चांदीचे दर स्थिर राहिल्यानंतरही भारतीय बाजारात घट नोंदवण्यात आली आहे. (gold silver price today update thursday gold silver fell check new rates )

संबंधित बातम्या – 

Gold rate today: सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा दर

PF चे पैसे काढायचे असतील तर आधी वाचा EPFO चे नियम

(gold silver price today update thursday gold silver fell check new rates )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.