PF चे पैसे काढायचे असतील तर आधी वाचा EPFO चे नियम

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये पीएफचे पैसे आपल्याला मिळतात. पण यासाठी काय नियमावली आहे पाहुयात.

PF चे पैसे काढायचे असतील तर आधी वाचा EPFO चे नियम
पीएफ अकाऊंट

नवी दिल्ली : निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. भविष्य निर्वाह निधी ही अशी रक्कम असते जी सेवानिवृत्तीनंतर आपल्याला मिळते. पण पीएफ संस्था (Employees’ Provident Fund Organisation) सेवानिवृत्तीच्या आधी विवाह, मेडिकल इमरजंसी, शिक्षण इत्यादींसाठी भविष्य निर्वाह निधीमधून काही प्रमाणात पैसे देते. यासाठी ईपीएफओची ऑनलाईन सुविधादेखील आहे. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये पीएफचे पैसे आपल्याला मिळतात. पण यासाठी काय नियमावली आहे पाहुयात. (provident fund withdrawing money here are few rules you should know)

EPFO चे नियम

1. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर खरेदी किंवा बांधकाम, कर्जाची परतफेड करण्यासाठी, दोन महिन्यांसाठी वेतन न भरणं, अर्धवट पैसे काढणं किंवा स्वत: मुलीच्या लग्नासाठी पीएफचे पैसे काढण्याची परवानगी आहे. इतकंच नाहीतर स्वत:, पत्नी, मुलं किंवा पालकांच्या उपचारांसाठीही तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता.

2. पीएफ पैसे ऑनलाइन काढण्यासाठी ग्राहकाकडे चालू युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असणं महत्त्वाचं आहे. यूएएन नंबर सक्रिय करण्यासाठी मोबाइल नंबरदेखील आवश्यक आहे.

3. आधार, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्ससोबत युनिव्हर्सल अकाउंट नंबर KYC वेरिफाइड करणं गरजेचं आहे

4. ग्राहक खात्यामधून आघाऊ पैसे काढण्यासाठी ईपीएफओच्या इंटिग्रेटेड पोर्टलद्वारे दावा करू शकतात. यानंतर हा दावा मालकाला मंजुरीसाठी पाठवला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर ही रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाते.

5. आर्थिक तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढून घेतल्यानंतर सेवानिवृत्तीच्या वेळी तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे नोकरी दरम्यान पीएफमधून पैसे काढायचे नाहीत हे लक्षात असूद्या.

6. पाच वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने पीएफ काढला तर करमुक्त असतो. जर ती व्यक्ती पाच वर्षांची सेवा पूर्ण न करता पीएफ काढते तर यामध्ये कर आकारला जातो. (provident fund withdrawing money here are few rules you should know)

संबंधित बातम्या – 

Fixed Deposit : नवीन वर्षात करा सुरक्षित गुंतवणूक, या 5 बँकाकडून FD वर सर्वाधिक व्याज

210 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 60 हजार, कोरोना काळात 15 लाख लोकांनी सुरू केली ‘ही’ सरकारी योजना

(provident fund withdrawing money here are few rules you should know)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI