
मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (excise duty ) कमी केलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपयांवरून 3 रुपये करण्यात आलं आहे. तर, डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांवरून शून्य करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पेट्रोलवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क पूर्वीच्या 13 रुपये प्रति लिटरवरून कमी करून 3 रुपये प्रति लिटर झालं आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्वीच्या 10 रुपये प्रति लिटरवरून कमी करून 0 करण्यात आले आहे.
नायराने वाढवले होते दर
गेल्या गुरूवारी देशातील सर्वात मोठी रिफायनरी असलेल्या नायरा एनर्जीने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले होते. नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ जाहीर केल्यानंतर, सरकारने पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांनी कमी केलं आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत पडला फरक
पश्चिम आशियामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आणि त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या होत्या. मात्र, इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले 10 दिवसांसाठी थांबवण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर, शुक्रवारी सकाळच्या सत्रात किमती किंचित घसरल्या. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ब्रेंट क्रूड 0.8.८% ने घसरून प्रति बॅरल 107.11 १ डॉलरवर आले, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) 0.88 % ने घसरून प्रति बॅरल 93.65 डॉलरवर आले. आदल्या दिवशी या दोन्ही तेलांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली होती.
गेल्या महिन्यात, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर युद्ध सुरू झालं आणि तणाव वाढला, प्रत्युत्तरादाखल, इराणने इस्रायल आणि आखाती देशांना लक्ष्य केले, जिथे अमेरिकेचे लष्करी तळ होते. इराण आणि लेबनॉनमधील हल्ल्यांमध्ये आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. या युद्धामुळे तेलपुरवठा विस्कळीत झाला असून, किमती वाढल्या आहेत आणि जगभरातील बाजारपेठांवर परिणाम झाला आहे.
निर्मला सीतरमण यांचं ट्विट
दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही यासंदर्भात एक महत्वाचं ट्विट केलं आहे.
पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, घरगुती वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रत्येकी 10 रुपयांनी (प्रति लिटर) कमी करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना भाववाढीपासून संरक्षण मिळेल. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यातील अनिश्चितता आणि किमतींपासून संरक्षण मिळावे, हे माननीय पंतप्रधान @narendramodi यांनी नेहमीच हे सुनिश्चित केलं आहे.
याशिवाय, डिझेलच्या निर्यातीवर प्रति लिटर ₹21.5 रुपये आणि ATFवर प्रति लिटर 29.5 रुपये दराने शुल्क आकारण्यात आले आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी या उत्पादनांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल. याबाबत संसदेला अधिसूचित करण्यात आले आहे, असं त्यांनी नमूद केलं.
In view of the West Asia crisis, the central excise duty on petrol and diesel for domestic consumption has been reduced by ₹10 per litre each. This will provide protection to consumers from rise in prices. Hon. PM @narendramodi has always ensured that citizens are protected from…
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) March 27, 2026