एफडी ही फायद्याची, जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळेल सर्वोत्तम परतावा

| Updated on: Dec 13, 2021 | 1:59 PM

एफडी मधील गुंतवणूक भरवश्याची असली तरी त्यावरील व्याजदर निचांकी पोहचल्याने ग्राहकांचे मन खट्टू झाले आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्यांसाठी एफडी हा कधीकाळी उत्पन्नाचा चांगला पर्याय होता.

एफडी ही फायद्याची, जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळेल सर्वोत्तम परतावा
money
Follow us on

नवी दिल्ली: एफडीतील घटता व्याजदर सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी निराशाजनक आहे. भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) या महिन्यात भारतीय चलनविषयक धोरण समिती(MRC) बैठक बोलावली होती. कोविड महामारीच्या (Covid 19 Pandemic) आणि ओमायक्रॉनच्या (Omicron)  पार्श्वभूमीवर या बैठकीत रेपो रेट 4 टक्केच ठेवण्याचा निर्णय झाला. ही एका दृष्टीने चांगली बातमी म्हणता येईल. तर मुदत ठेवीत (Fixed Deposit ) गुंतवणूक करणा-या ठेवीदारांना हा निर्णय निराशाजनक वाटणं सहाजिकच आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून हा रेट सातत्याने कमी होत आहे.

मागील काही वर्षांपासून अनेक बँका(Bank) आणि बँकिंग फायनान्स कंपन्यांनी (NBFC) त्यांच्या मुदत ठेव व्याजदरात सातत्याने घट नोंदवली आहे. अशा वेळी, एचडीएफसी बँक(HDFC Bank) आणि बजाज फायनान्स (Bajaj Finance) ने मात्र या गुंतवणुकदारांसाठी दिलासादायक धोरण स्वीकारलं आहे. या दोघांनी एफडीतील व्याज दरात वृद्धी केली आहे. सुरक्षीत उत्पन्न शोधणा-या ग्राहकांसाठी ही एक चांगली बातमी असून त्यांनी याविषयीचा निर्णय घ्यावा.

अधिक उत्पन्नासाठी एफडी गुंतवणुकदारांसाठी उपाय

लेडर स्ट्रेटेजी चा वापर करुन वाढवा उत्पन्न

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, मुदत ठेवीवरील व्याज दर सध्या निचांकी स्तरावर आहेत. परंतु, वित्तीय सल्लागारांच्या मते, या सुरक्षीत सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी फायद्याच्या काही संधी दडलेल्या आहेत. गुंतवणुकदारांनी ठेवीवर जास्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी एफडी लैडर स्ट्रेटर्जी चा वापर करु शकता. तुमची मोठ्या रक्कमेची मुदत ठेव तोडून ती अल्पवधी योजनेत(Short Term) परावर्तीत करण्यात येते. त्यामुळे एकाच ठिकाणी खूप मोठी रक्कम कमी व्याजदरावर गुंतवणुकीपासून वाचते आणि इतर ठिकाणाहून चांगल्या परताव्यासह अधिकचे उत्पन्न मिळते.

दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीपासून सावधान

सल्लागारांच्या मते, ज्या गुंतवणुकदारांचे मुदत ठेव खाते आहे, त्यांनी दीर्घ मुदतीच्या (Long Term) खात्यात गुंतवणूक टाळणेच योग्य राहिल. अल्प मुदतीच्या योजनेत ठेव ठेवल्याने पैसा अडकून राहण्याची आणि त्यावर कमी व्याजदर मिळण्याची भीतीपासून हायसे वाटते. तर दुसरीकडे अल्प कालावधीत चांगल्या व्याज दराची हमी पण मिळते. त्यातच बँका अथवा NBFC यांच्या धोरणांनी व्याजदर अधिक मिळत असेल तर तो फायदाही उठवता येतो.

अल्प मुदत ठेवीत व्याजदर अगोदर वाढतात

मुदत ठेव गुंतवणुकदारांनी याकडे लक्ष दिले पाहिजे की, ज्यावेळी ही व्याज दरात वाढ होते. ती सर्वात अगोदर अल्पमुदत ठेव योजनेत व्याज दर वाढतात. त्यामुळे अल्प मुदत ठेव योजनेत गुंतवणूक चांगला पर्याय ठरु शकते.

इतर बातम्या:

मद्यप्रेमींसाठी खुशखबर; नववर्ष, ख्रिसमसला मिळणार स्वस्त दारू

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Insurance | होम इन्शुरन्स पॉलिसीत मिळू शकते का पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई? जाणून घ्या काय आहेत नियम