AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Insurance | होम इन्शुरन्स पॉलिसीत मिळू शकते का पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई? जाणून घ्या काय आहेत नियम

नदी काठावरील गावं पूर परिस्थिती जीव मुठीत घेऊन जगतात. पुरामुळं त्यांचं अतोनात नुकसान होते. अशावेळी शासकीय मदतीशिवाय आणखी एक भरोशाचा उपाय करता येऊ शकतो, तो म्हणजे घराचा विमा. पॉलिसीतील पुरापासून नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा पर्याय स्वीकारला तर तुम्हाला अशा आपदेतही मदतीचा हमखास हात मिळू शकतो.

Insurance | होम इन्शुरन्स पॉलिसीत मिळू शकते का पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई? जाणून घ्या काय आहेत नियम
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 9:53 AM
Share

मुंबई : नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही, मात्र त्यापासून वाचण्यासाठी पूर्वनियोजन करता येऊ शकते. आता पुरामुळे होणाऱ्या प्रचंड नुकसानीचेच पहा ना. पुरामुळे गावची गाव उद्ध्वस्त होतात. तेव्हा शासकीय यंत्रणकडे टाहो फोडावा लागतो. ती मदत ही केव्हा मिळेल याची खात्री नसते. पण, तुमचा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला अशा ही परिस्थिती भरोशाची मदत मिळवून देऊ शकतो. काय आहे तो उपाय.

तर तो खात्रीशीर पर्याय म्हणजे तुम्ही काढलेला घराचा विमा (Home Insurance). आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे? तर, आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा खमका उपाय काय आहे ते आणि त्याचे नियम ही. चला तर मग जाणून घेऊयात…

उत्तर भारतासह पुर्वेकडील आणि दक्षिणेतील राज्यांना पुराचा दरवर्षी तडाखा बसतो. मुसळधार पाऊस कोसळत असताना जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढून आपली मुंबई ही तुंबापुर होते तर सातारा,सांगली, कोल्हापूर आणि कोकणात, मराठवाड्यासह वऱ्हाडात अतोनात नुकसान होते. अनेक ठिकाणी घरं पाण्याखाली जातात आणि घरातील सामान वाहून जाते. मग या नुकसानीची भरपाई मिळते का? तर उत्तर आहे, होय. नुकसान भरपाई मिळते.

होम इन्शुरन्समध्ये (Home Insurance) आग, भूकंप यापासून संरक्षण आहे, तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. तसेच तुम्हाला पुरापासून झालेल्या नुकसानीची ही भरपाई मिळवता येते. एवढेच नाही तर घरातील सामानाची नुकसानीची मदत मिळू शकते. अनेक विमा कंपन्या होम इन्शुरन्स फॉर फ्लड (Home Insurance For Flood) अशी योजना घेऊन आल्या आहेत. त्याचा अशा आपत्तीत तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.

इन्शुरन्स खरेदी करा ऑनलाईन 

पूर संरक्षण विमा तुम्हाला ऑनलाईन (online) खरेदी करता येईल. याचा कालावधी ही मोठा असल्याने अधिक दिवस विमा संरक्षण प्राप्त होते. या योजनेत तुम्हाला  कागदपत्रांची किचकट प्रक्रिया करण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पुरापासून संरक्षणाचा विमा उतरवू शकता. विशेष म्हणजे विम्याची धनराशी वाढविता येते. पुरग्रस्त भागात सर्व्हेक्षण करुन कंपनी तुमच्या क्लेम मंजूर करते.

या तीन प्रकारात संरक्षणाची हमी:

नदीचा पूर:

नदीतील जलस्तर वाढल्याने पाण्याचा फटका आजुबाजूच्या परिसराला बसतो. ओढ्यानाल्यांचं पाणी एकत्र येऊन सर्व परिसर जलमय होतो. या पाण्यामुळे गावाला वेढा पडतो. या पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते.

पावसामुळे आलेला पूर:

सततच्या मुसळधार पावसामुळे , आभाळ फाटल्यामुळे गावची गावे पुराने वेढली जातात. त्यांचा संपर्क तुटतो. घराघरात पाणी घुसते. काही ठिकाणी घरे पाण्याखाली जातात. त्यांची पडझड होते. घर नेस्तनाबूत होतात. अशा वेळी ही विमा योजना कामी येते.

काठाशेजारील परिसराला फटका

नदी, नाले, ओढे यासह समुद्र किनाऱ्यावरील घर, इमारतींना पुराचा, सोसाट्याच्या वाऱ्याचा, खवळलेल्या लाटांचा मारा सहन करावा लागतो. परिणामी घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते.  या नुकसानीसाठी दाखल क्लेम विमा योजनेत मंजूर होतो.

या बाबी लक्षात घ्या

ज्या ज्या गोष्टींचे नुकसान झाले आहे, त्याचे छायाचित्र (photo) काढा. खराब झालेले सामान, नुकसानग्रस्त साहित्य सांभाळून ठेवा. विमा कंपनी प्रतिनिधी सर्वेक्षणासाठी येतील. तुमच्याकडे नुकसानीसंदर्भात पुरावे मागतील, तेव्हा त्याची खासा गरज पडेल. दरम्यान तुम्ही सामान दुरुस्त केले असेल, डागडुजी केली असेल तर त्याची नगद पावती संभाळून ठेवा, दावा (Claim) करताना त्याची गरज पडेल.

संबंधित बातम्या :

या आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, दोन दिवसांच्या आत पूर्ण करा पैशांचे व्यवहार

ज्योतिषामुळे बदलले नशीब, दिवसाची कमाई 32 लाखांपेक्षा अधिक; कोण आहेत पुनीत गुप्ता?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.