या आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, दोन दिवसांच्या आत पूर्ण करा पैशांचे व्यवहार

या आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, दोन दिवसांच्या आत पूर्ण करा पैशांचे व्यवहार

तुमचे बँकेशी संबंधित काही कामे असतील तर ते आजच उरकून घ्या, कारण या आठवड्यामध्ये तब्बल चार दिवस बँका बंद राहणार आहेत. 16 आणि 17  डिसेंबरला  बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच 18 आणि 19 तारखेला विकेंडमुळे बँका बंद राहातील.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 13, 2021 | 8:02 AM

नवी दिल्ली : तुमचे बँकेशी संबंधित काही कामे असतील तर ते आजच उरकून घ्या, कारण या आठवड्यामध्ये तब्बल चार दिवस बँका बंद राहणार आहेत. 16 आणि 17  डिसेंबरला  बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच 18 आणि 19 तारखेला विकेंडमुळे बँका बंद राहातील. त्यामुळे गुरुवार ते रविवार अशा सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. सध्या केंद्राकडून अनेक बँकांचे खासगीकरण करण्यात येत आहे. याविरोधात युनायटेड फोरम ऑफ युनियनच्या वतीने दोन दिवसांच्या संपाची हाक देण्यात आली आहे.

कर्मचारी संपावर

या आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. तर शनिवारी  यूसोसो थाम यांची पुण्यतिथी असल्यामुळे शिलॉंगसह देशातील काही भागांमध्ये बँका बंद राहातील. तसेच शनिवार असल्यामुळे इतर राज्यांमध्ये देखील बँकेच्या कामावर परिणाम होऊ शकतो. रविवारी आठवडी सुटी आहे. याचाच अर्थ या आठवड्यात बँका तब्बल चार दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमचे जर बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर या दोन दिवसांच्या आतच ते पूर्ण करवे लागणार आहे.

खासगीकरणाला विरोध

2021 च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी देशातील दोन बँकांचे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली होती. बँकेच्या खासगीकरणाला  बँक कर्मचारी तसेच विविध बँक संघटनांच्या वतीने विरोध करण्यात  आला आहे. देशातील ग्राहकांच्या जवळपास सत्तर टक्के ठेवी या सरकारीु बँकांमध्ये आहे. बँकांचे खासगीकरण केल्यास सर्वसामान्यांचा पैसा संकटात सापडू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. खासगीकरणाच्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी येत्या 16 आणि 17  डिसेंबरला देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान संप काळामध्ये बँकेच्या ऑनलाईन सेवेवर कोणताही परिणाम होणार नसून, या काळात फक्त बँकेची ऑफलाईन कामे बंद राहणार आहेत.

संबंधित बातम्या

ज्योतिषामुळे बदलले नशीब, दिवसाची कमाई 32 लाखांपेक्षा अधिक; कोण आहेत पुनीत गुप्ता?

क्रिप्टोच्या दरात तेजी; जाणून घ्या प्रमुख करन्सींचे दर

कोरोनामुळे झालेले नुकसान वेगाने भरून काढणाऱ्या निवडक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश; अर्थ मंत्रालयाकडून अहवाल सादर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें