भारतातील या सात शहरांमध्ये झपाट्यानं वाढतायेत घराच्या किंमती, जाणून घ्या रिपोर्ट काय सांगतो?

आपल्या मालकीचं हक्काचं घर असावं असं सर्वांचं स्वप्न असतं. मात्र महागाईच्या जमा‍न्यामध्ये सर्वांनाच आपलं हे स्वप्न पूर्ण करता येतं असं नाही. यातच आता नुकताच एका रियल इस्टेट कंपनीचा एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गेल्या तीन महिन्यांत सात प्रमुख शहरांमधल्या घरांच्या किंमतीमध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारतातील या सात शहरांमध्ये झपाट्यानं वाढतायेत घराच्या किंमती, जाणून घ्या रिपोर्ट काय सांगतो?
| Updated on: Jun 26, 2025 | 9:55 PM

आपल्या मालकीचं हक्काचं घर असावं असं सर्वांचं स्वप्न असतं. मात्र महागाईच्या जमा‍न्यामध्ये सर्वांनाच आपलं हे स्वप्न पूर्ण करता येतं असं नाही. यातच आता नुकताच एका रियल इस्टेट कंपनीचा एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गेल्या तीन महिन्यांत सात प्रमुख शहरांमधल्या घरांच्या किंमतीमध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर तुम्हालाही घर खरेदी करायचं असेल तर जाणून घ्या, या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं ते?

घराच्या विक्रीमध्ये वीस टक्क्यांनी घट

देशातील प्रमुख सात शहरांमधील घराच्या किंमतीमध्ये तब्बल 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे घराच्या विक्रीमध्ये 20 टक्क्यांनी घट झाली आहे.रियल इस्टेट सल्लागार एनारॉककडून भारतातील सात प्रमुख शहरातील घरांची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये घराच्या विक्रीमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी घट झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये एकूण 96,285 घरांची विक्री झाली, तेच गेल्या वर्षी घराच्या विक्रीचं हे प्रमाण 1,20,335 यूनिट इतकं होतं.

कोणत्या शहरातील घरांच्या विक्रीमध्ये घट?

राजधानी दिल्ली, मुंबई शहर आणि उपनगर, बंगेळुरू, हैदराबाद, पुणे, आणि कोलकाता या शहरांमधील घराच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. मात्र दुसरीकडे चेन्नईमध्ये घराची मागणी वाढल्याचं दिसून येत आहे. याबाबत बोलताना एनारॉकच्या चेअरमन अनुज पुजारी यांनी म्हटलं आहे की, 2025 दुसऱ्या तिमाहीमध्ये रिअर इस्टेटचा बाजार काही प्रमाणात अस्थिर राहिला आहे, या काळात मोठ्या प्रमाणत चढ- उतार पाहायला मिळाले. सध्या जगावर युद्धाच सावट आहे. जगातील अनेक देश युद्धांमध्ये गुंतलेले आहेत, त्याचा परिणाम यावर दिसून आला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून घरांच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, आता सध्या भारतामध्ये शांतता आहे, तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेनं देखील रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. घराची मागणी वाढल्यामुळे किंमतीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. भारतातील प्रमुख सात शहरांमध्ये घराच्या किंमतीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये 11 टक्के तर सर्वाधिक दिल्ली एनसीआरमधील घराच्या किंमती तब्बल 27 टक्क्यांनी वाढल्या आहेत. हैदराबाद, बंगळूरू आणि मुंबईमध्ये देखील घराच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे.