AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑटो रिक्षा चाालवणारे दिवसाला किती कमवतात? खर्च वजा करून किती पैसे शिल्लक राहतात?

ऑटो रिक्षा चालवून दिवसाला किती कमाई करतात रिक्षा ड्रायव्हर? कमाई पाहून नोकरदार देखील थक्क. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

ऑटो रिक्षा चाालवणारे दिवसाला किती कमवतात? खर्च वजा करून किती पैसे शिल्लक राहतात?
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 13, 2026 | 3:57 PM
Share

देशभरात दररोज लाखो लोक प्रवासासाठी ऑटो रिक्षाचा वापर करतात. कमी अंतराचा प्रवास असो किंवा रेल्वे स्थानक, बसस्थानक गाठायचं असो, ऑटो रिक्षा हे अनेकांसाठी सोयीचं साधन आहे. त्यामुळे ऑटो रिक्षा चालवून किती कमाई होते आणि सर्व खर्च वजा करता महिन्याला किती पैसे शिल्लक राहतात असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, या व्यवसायातील उत्पन्न हे शहर, प्रवाशांची संख्या आणि रोजच्या कामाच्या तासांवर अवलंबून असतं.

ऑटो रिक्षा चालवताना इंधन किंवा चार्जिंग, वाहनाची देखभाल, दुरुस्ती, टायर आणि सर्व्हिसिंग यांसारखे खर्च नियमितपणे करावे लागतात. सीएनजी किंवा विजेवर चालणाऱ्या रिक्षांसाठी दररोज साधारण 200 ते 300 रुपये खर्च येऊ शकतो; मात्र प्रत्यक्ष खर्च प्रवासाचं अंतर आणि स्थानिक दरांनुसार बदलतो. याशिवाय रिक्षा कर्जावर घेतली असल्यास मासिक हप्ताही भरावा लागतो. त्यामुळे दिवसभरात मिळालेली संपूर्ण रक्कम ही चालकाची निव्वळ कमाई नसते.

महिन्याला किती पैसे कमावता येतात?

मोठ्या शहरांमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असल्याने ऑटो चालकांना तुलनेने अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. दिलेल्या अंदाजानुसार, काही शहरांमध्ये चालकांची दररोजची कमाई एक ते दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. तर लहान शहरांमध्ये ती साधारण 500 ते 800 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, हे आकडे निश्चित नसून प्रत्यक्ष कमाई मागणी, कामाचे तास, भाडेदर आणि स्पर्धेवर अवलंबून असते.

सर्व खर्च वजा केल्यानंतर काही चालकांना महिन्याला 20 ते 30 हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम शिल्लक राहू शकते. मात्र, प्रत्येक चालकाला एवढी बचत होईलच असं नाही. वाहनाचं कर्ज, भाडं, देखभाल आणि इतर खर्च यांमुळे निव्वळ उत्पन्नात मोठा फरक पडू शकतो.

ऑटो रिक्षाचा व्यवसाय फायदेशीर आहे का?

ऑटो रिक्षा चालवणं हा नियमित उत्पन्न मिळवण्याचा एक पर्याय ठरू शकतो. मात्र, त्यासाठी मेहनत, वेळेचं नियोजन आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. वाहतूक कोंडी, दीर्घकाळ वाहन चालवल्यामुळे येणारा थकवा आणि प्रवाशांची अनिश्चित मागणी ही या व्यवसायातील प्रमुख आव्हानं आहेत. त्यामुळे ऑटो खरेदी करण्यापूर्वी एकूण खर्च, कर्जाचे हप्ते आणि संभाव्य उत्पन्न यांचं योग्य गणित मांडणं महत्त्वाचं आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...