
भारतातील अब्जाधीशांच्या जग केवळ पैसा आणि बिझनेसपर्यंत मर्यादित नाही. हैराण करणारी बाब म्हणजे यातील अनेकांनी आपल्या यशाची सुरुवात कॉलेजच्या इयत्तेतून नव्हे तर अर्धवट डिग्री आणि अनोख्या निर्णयातून केली आहे. कोणी स्टॅनफोर्डमधून तर कोणी हार्वर्डमधून एमबीए केले. काहींनी शाळेतील शिक्षण अर्धवट सोडले, तर काहींनी मानद डॉक्टरेट मिळवली. M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 च्या नुसार भारताच्या टॉप 10 श्रीमंत लोकांचा शिक्षणाचा प्रवास सांगतोय की यशाचे मार्ग एक सारखा नसतो. चला तर पाहूयात देशाचे टॉप अब्जाधीश किती शिकले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे 9.55 लाख कोटी संपत्तीचे मालक असून सध्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी हिल ग्रेंज हायस्कूल मधून शिक्षण घेतले. आणि मुंबई विद्यापीठातून इंजिनिअरिंगमध्ये स्नातक पदवी घेतली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीए सुरु केले होते, परंतू ते शिक्षणमध्येच सोडून त्यांनी धीरुभाई अंबानी यांचा बिझनेस सांभाळायला सुरुवात केली.
अहमदाबादच्या शेठ चिमनलाल नागिंदास विद्यालयातून आपले शालेय शिक्षण सुरु करणाऱ्या गौतम अदानी यांनी गुजरात युनिव्हर्सिटीत कॉमर्समध्ये प्रवेश घेतला, परंतू दुसऱ्या वर्षीच शिक्षण सोडले आणि तेथूनच व्यवसायाकडे वळले आणि स्वत:चा बिझनेस सुरु केला.
एचसीएल टेक्नोलॉजीजच्या चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा यांनी नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीतून कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन आणि केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे.
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी पुण्याच्या बिशप स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर 1966 मध्ये बीएमसीसी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर 1988 मध्ये पुणे युनिव्हर्सिटीतून पीएचडी केली. त्याशिवाय ऑक्सफोर्ड आणि यूनिव्हर्सिटी ऑफ मॅसाचुसेट्स येथून त्यांना मानद डॉक्टरेटने गौरवण्यात आले.
आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स एण्ड इकॉनॉमिक्समधून ग्रॅज्युएशन केले. आणि लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. ते चार्टर्ड अकाऊंटन्ट देखील आहेत. आणि लंडन बिझनेस स्कूलचे ते ऑनरेरी फेलो देखील राहिले आहेत.
कॅथेड्रल एण्ड जॉन कॉनन स्कूलमधील शिक्षणानंतर निरज बजाज यांनी मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून बी.कॉम केले. आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. सध्या ते बजाज ग्रुपचे चेअरमन आहेत.
दिलीप सांघवी यांनी जे.जे.अजमेरा हायस्कूलमधून शिक्षण घेतले आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोलकाता येथून बी.कॉमची डिग्री मिळवली आहे. सध्या ते सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.
विप्रो लिमिटेडचे चेअरमन अझीम प्रेमजी यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन केले आहे. त्यांनी 1960 दशकात वडीलांचा व्यवसाय सांभाळला. आजही ते त्यांच्या साधेपणा आणि समाजसेवेसाठी ओळखले जातात.
Gen Z उद्योग कैवल्य वोहरा यांनी मुंबईतील कॉम्प्युटर इंजीनियरिंग सुरु केले आणि त्यानंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर अभ्यास अर्धवट सोडून त्यांनाी 19 व्या वयात Zepto ची सुरुवात केली.